31 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषवातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

वातावरण बदलाचा परिणाम वेळास कासव महोत्सवावर

Google News Follow

Related

वेळास कासव महोत्सवला २००२ पासून सुरुवात झाली. त्यावेळेस नोव्हेंबर महिन्यात अंडी सापडायला सुरुवात व्हायची. साधारण राज्यामध्ये नोव्हेंबर ते मार्च हा अंडी घालण्याचा समुद्र कासवांचा काळ असतो, हे बऱ्याच रिसर्च पेपरमध्ये नमूद आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जो नोव्हेंबरचा काळ हा डिंसेंबरमध्ये यायला लागला आहे. याचा अर्थ एक महिना उशीरा कासव अंडी घालायला लागले आहेत. अर्थातच घरटी उशीरा मिळायला लागली होती.

यावर्षी ही घरटी जानेवारीपासून सुरू झालेली आहेत. म्हणजे नोव्हेंबरही गेला, डिसेंबरही गेला आणि जानेवारीपासून वेळासमध्ये बऱ्यापैकी घरटी मिळायला लागली आहेत. जसा हा काळ पुढे जातो, तसा अंडी उबवून पिल्ले बाहेर पडण्याचाही काळ पुढे जातो. त्याच्यामुळे फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठड्यात जो कासव महोत्सव जो सुरू व्हायचा तो अजून सुरू झालेला नाही.

दरवर्षी कासवांची जी अंडी सापडतात. त्यातील पहिली दोन-तीन घरटी किती दिवसांनी उघडतात, त्यावर लक्ष ठेवले जाते आणि त्यानंतर अंड्यांना उबवणीला किती दिवस जातील, यांचा अंदाज घेतला जातो. त्याचा अंदाज घेऊन, तो काळ मोजून मग पुढच्या घरट्यांचा तारखा जाहीर केल्या जातात. तसा कासव फेस्टिव्हल जाहीर केला जातो. तर या वर्षी असं झालं की, पहिलं घरटं अजूनही उघडलेलं नाही, त्यामुळे कासव फेस्टिव्हलच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही कासवांच्या उबवणीला किती दिवस लागतील, याचा अंदाज नाही. कासवाचं एक घरटं जरी उघडलं तरी अजून पुढची एक–दोन घरटी उघडल्याशिवाय किती दिवस उबवणीला लागतील यांचा अंदाज घेतला जाईल. या घरट्याला ४० दिवस लागतात, ५० दिवस लागतात की ५५ दिवस लागतात यांचा अंदाज घेतला जाईल. त्यामुळे अजून तारखा जाहीर झालेल्या नाहीत, असे मोहन उपाधअये म्हणाले.

गेल्या वर्षी घेतले जास्त दिवस

साधारण उबवणीचा काळ हा पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांचा असतो. गेल्यावर्षी खूप जास्त थंडी होती, त्यामुळे काही किनाऱ्यांवरती घरटी उघडायला ७० दिवस लागले. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे घरटी उघडण्यावरही परिणाम होत आहे. सुरुवातीला ही घरटी ६० दिवसांनी उघडायची ती ७० दिवसांनी उघडली होती. मध्येच कधीतरी पाऊस पडतो, मध्येच थंडी येते. त्याचाही परिणाम त्यांच्या उबवणीवर होतो आहे.

वेळास बीच बदलला

यावर्षी वेळासमध्ये घरटी कमी होतील, असा अंदाज होता. वेळास बीचचा प्रोफाइल पूर्ण बदललेला आहे. पूर्वी जो किनारा होता, तो आता तसा आता राहिलेला नाही. तिथे अतिरिक्त सुरूची झाडे वाढली आहेत. लागवड न केलेले सुरू वाळूच्या दिशेने वाढू लागले आहेत. मारवेली वाढत चालल्या आहेत. त्यामुळे किनारा आणखी आतमध्ये आल्याने पाणी आणखी आतमध्ये यायला लागले आहे. या मारवेली पाण्याचा करंट बदलू शकतात. करंटवरती ही कासवं अंडी घालण्यासाठी बाहेर पडतात. त्याचा परिणाम भविष्यात कासवांवर होऊ शकतो.

एक मादी दोन ते तीनवेळा अंडी देते

गेल्यावर्षी खूप जास्त घरटी मिळालेली होती. पण या वर्षी तेवढी घरटी होणार नाहीत, असे वाटले होते. जानेवारी महिन्यात अंडी मिळाल्याने ही संख्या समाधानकारक आहे. समुद्री कासवांची एक सिस्टीम असते. एक मादी एका सिझनमध्ये नोव्हेंबर ते मार्चमध्ये दोन किंवा तीन वेळासुद्धआ अंडी घालू शकते.

अंड्याची काळजी घेतली जाते

अती तापमान झाल्यामुळे अंडी खराब होऊ शकतात. थंडी जास्त वाढली, पाऊस जास्त झाला तरी अंडी खराब होऊ शकतात. त्याची खबरदारी म्हणून आच्छादन केले जाते, असे मोहन उपाध्ये म्हणाले.

पर्यटकांसाठी सुविधांची काळजी

वेळासमध्ये कासव फेस्टिव्हला गेल्या वर्षी १० हजार पर्यंटकांनी भेट दिल्या होत्या. वेळास कासव फेस्टिव्हलसाठी १०० रुपये फी घेतली जाते. बीचवर रिसतर पावती घेतली जाते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती या नावाने ही पावती दिली जाते. कोकणात वादळ झाले तेव्हा पर्यटकांना खूप अडचणी निर्माण झाल्या. त्यासाठी पर्यटकांना चांगल्या सोयीसाठी निधीची आवश्यकता होती. सोलार दिवे लावले गेले. कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. बसण्यासाठी आसने बसवण्यात आली आहेत.

पर्यटकांसाठी तक्रार वही

फेस्टिव्हलमुळे गावातल्या लोकांना कम्युनिकेशन स्कील समजली, होस्ट कसं करावं हे समजलं. परंतु ग्राहकांना उत्तम सेवा मिळावी, यासाठी यावर्षीपासून तक्रार वहीही ठेवली जाणार आहे. कोणाला खाणे, राहणे या बाबतीत काही सूचना असतील, तर ते या वहीत नोंद करू शकतात.

हरेहरेश्वर-बाणकोट ब्रीजचा परिणाम नाही

हरेहरेश्वर ते बाणकोट या खाडीवर ब्रीज बनवला जात आहे. परंतु या ब्रीजचा तेवढा परिणाम होणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तो खाडीच्या तोंडावरती आहे. ब्रीजचे पीलर टाकले गेले, त्यावेळेस पाण्याचा करंट थोडा बदलला. हे जर समुद्र किनाऱ्याजवळ असतं, तर परिणाम झाला असता. खाडीतलेच करंट थोडे बदलल्यामुळे तेवढा परिणाम कासवांच्या वर झालेला नाही. पीलर पडल्यानंतर जलचर प्राण्यांच्या हालचालीत फरक जाणवला असता. परंतु आजही मच्छिमारांना कासवं पोहताना दिसतात. डॉल्फीन पोहचाना दिसतात. याचा स्पष्ट अर्थ आहे की त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही. फक्त पाण्याने दिशा बदली आहे. वेळासला ओहोटली मोठी वाळूची मोठी भाट पडते, आठ वर्षे झाली पीलर टाकून, अजूनही भाट पडते, याचा मोठा अजून पुरावा असूच शकत नाही, असे मोहन उपाध्ये म्हणतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा