25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरविशेषरेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!

रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!

Google News Follow

Related

दादर स्थानक… ११ वाजून ३८ मीनिटाची बोरीवली लोकल. पावसाळी वातावरण असल्याने साधारण १५ मीनिटे उशिराने. याआधी एसी लोकल गेल्याने प्लॅटफॉर्मवर वाढलेली गर्दी. लोकल येताच प्रवाशांचा लोंढा गाडीत शिरताच समोर पाय पसरून झोपलेला गर्दुला. गर्दुल्याला खटकताच अर्वाच्च आणि उद्धट भाषेत उत्तर. एवढ्यावरच न थांबता लोकलच्या डब्यात महिलांसमोर कपडे बदलतोय. यावर प्रवाशांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच त्यांच्याबरोबरच झटापट. यावर या गर्दुल्याची तक्रार रेल्वे हेल्पलाइन १५१२ या नंबर दादर स्थानक सुटल्याच केलेली होती. त्याची दखल रेल्वे पोलिसांनी घेत या गर्दुल्याच्या क्षणाचाही विलंब न करता मुसक्या अंधेरी स्थानकात आवळल्या. या सर्व घटनाक्रमानंतर रेल्वे हेल्पलाइन १५१२ कशाप्रकारे सुंदर काम करते याचा अनुभव मला आणि सहप्रवाशांना आला.

चालत्या रेल्वे गाड्यांमधील गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्या कारणाने, त्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. बऱ्याच वेळा ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांना विकृतांवर कारवाई करणे कठीण जाते. त्यासाठी १५१२ या रेल्वे हेल्पलाइनची योजना आखली. खरोखरच या हेल्पलाइनचा अनुभव आज मला आला. दादरपासून धुडगूस घालणाऱ्या या गर्दुल्याची तक्रार केली. फोन करेपर्यंत बांद्रा स्थानक आले होते. त्यामुळे तक्रार करताना ही गाडी आता बांद्रा स्थानकातून सुटेल, तर तुम्ही याच्या मुसक्या अंधेरी स्थानकात आवळा, असे फोनवर सांगितले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात आवळल्या होत्या.

तर झाले असे, हा गर्दुला चर्चगेट ते बोरीवलीच्या लोकलमध्ये धुडगूस घालत होता. चर्चगेटहून सुटणारी ही गाडी दादरला सकाळी ११.३८ वाजता पोहोचते. या लोकलमध्ये हा गर्दुला सीटवर झोपलेला होता. दादर तसे नेहमी वर्दळीचे स्थानक. सकाळी प्रवास करा किंवा रात्री नेहमी लोकल तुडुंब भरलेल्या असतात. या लोकलमध्ये मागच्या फर्स्ट क्लास डब्यामध्ये प्रवाशी चढल्यानंतर एक गर्दुला सीटवर झोपलेला होता. त्याला उठून बस, असे खटकल्यानंतर त्याने उर्मट उत्तर देण्यास सुरुवात केली. आप उधर बैठो, मुझे सोनेका है, अशा आविर्भावात उलट-सुलट बोलण्यास त्याने सुरुवात केली. डब्यात महिलाही प्रवास करत होत्या. त्यानंतर काही महिला व युवक त्याच्या समोर बसलेल्या सीटवरून उठून गेल्या. त्यानंतरही या गर्दुल्याने आपली बडबड सुरूच ठेवली. त्यातील एका युवकाने त्याला गपचूप बस नाहीतर, पोलिसांना फोन करून तुझी तक्रार करतो, असे सांगितले. त्यानंतर कर लो फोन, क्या करेंगा तू, पुलिस क्या करेगी अशा उत्तरांची सरबती सुरूच ठेवली.

हेही वाचा :

योगी सरकारचा निष्क्रिय अधिकाऱ्यांना दणका!

लडाखमध्ये रणगाडा सरावावेळी भारतीय सैन्याच्या पाच जवानांना हौतात्म्य !

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास काय होईल?

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजाना’ सुरु करणार

बांद्रा स्थानक जाताच या गर्दुल्याने चक्क कपडे बदलण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या बाजूला बसलेल्या युवकाने ये तेरा घर है क्या, चुपचाप बैठो असे सांगितले. त्यानंतरही तुझे क्या करने का है, असे युवकाला प्रत्त्युतर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या युवकाने त्याला एक चापटी मारली. एका चापडीचा हा गर्दुला क्षणार्धात कोसळला. तोपर्यंत अंधेरी स्टेशन आले. अंधेरीला पोलिस येऊन या गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या आणि रेल्वे पोलिस त्याला अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा