बोईसर येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुर राऊत यांचे वडील यशवंत भिकाजी राऊत (वय ८५) यांचे गुरुवार, ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर बोईसर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा..
शशी थरूर यांनी आणीबाणीच्या क्रूर काळाची करून दिली आठवण
ठाकरे गटावर का भडकले उदय सामंत ?
पप्पू यादव, कन्हैया कुमारना जागा दाखवली
स्व. यशवंत राऊत यांचा जन्म १ जून १९४० रोजी झाला होता. त्यांनी प्रथम ३ वर्षे जिल्हा परिषद, ठाणे येथे शिक्षक म्हणून काम केले व नंतर ३२ वर्षे बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदावर सेवा बजावली. त्यांच्या पश्चात पत्नी स्नेहलता राऊत (टूर ऑपरेटर), मुलगा अंकुर राऊत (उद्योजक), सून नेहा, नातू अर्णव व नात आराध्या, मुलगी उन्नती (गृहिणी) व मुलगी अंजली (गृहिणी) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राऊत यांच्या निवासस्थानी बोईसर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. राऊत कुटुंबियांचे सांत्वन केले.







