28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषमुंबई- नवी मुंबई दोन्ही विमानतळे जोडणाऱ्या ‘मेट्रो लाईन- ८’ ची घोषणा!

मुंबई- नवी मुंबई दोन्ही विमानतळे जोडणाऱ्या ‘मेट्रो लाईन- ८’ ची घोषणा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आराखडा

Google News Follow

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, २७ जानेवारी रोजी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा केली. ३५ किमी लांबीच्या या मार्गाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पुढील तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पायभूत सुविधा समितीची बैठक पार पडली आणि याच बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचा विस्तार हा गोंदिया- भंडारा- गडचिरोली या जिल्ह्यांपर्यंत होणार असल्याचीही घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारी मेट्रो लाईन- ८ या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पातील मेट्रो मार्गाची लांबी ३५ किलोमीटर असेल आणि त्याचा भूमिगत मार्ग ९ किलोमीटर असेल. यात २५ स्थानके असतील. लोकमान्य टिळक टर्मिनस या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाला या मेट्रो मार्गाला जोडले जाईल. तसेच इतर तीन मेट्रो मार्गही या मार्गाला जोडले जातील. यासाठी अंदाजे १८,००० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा : 

गोवा विशेष: युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांचे गोव्याशी आहे खास नाते! जाणून घ्या नेमकं प्रकरण

“आम्ही केले!” भारत- युरोपियन युनियनमध्ये ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षरी

बांगलादेश: हिंदू तरुणांच्या लिंचिंग प्रकरणातील आरोपीकडून तक्रार मागे घेण्याची धमकी

भारत आणि युरोपियन युनियन करार, दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे उदाहरण!

राज्य सरकारने पीपीपी मॉडेलवर मेट्रो बांधण्यास मान्यता दिली आहे, ज्यामध्ये राज्य आणि केंद्र प्रत्येकी २० टक्के वाटा व्यवहार्यता अंतर निधीतून देईल. उर्वरित ६० टक्के रक्कम मेट्रो बांधणाऱ्या खाजगी पक्षाकडून आणली जाण्याची अपेक्षा आहे. मेट्रो मार्ग पाच वर्षांत बांधण्याचा अंदाज आहे, परंतु तो साडेतीन वर्षांत बांधावा असा आग्रह धरला आहे, असे फडणवीस यांनी मंजुरीची घोषणा करताना सांगितले. मुंबईतील नव्या मेट्रोसह समृद्धी महामार्गाच्या विस्तार, नाशिक शहर परिक्रमा मार्ग, सुरजागड महामार्गाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा