27 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषखोल दरीत कोसळले सैन्याचे वाहन, ३ जवानांचा मृत्यू

खोल दरीत कोसळले सैन्याचे वाहन, ३ जवानांचा मृत्यू

Google News Follow

Related

जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात तीन सैन्य जवानांचा मृत्यू झाला. सैन्याचं वाहन खोल दरीत कोसळलं. एका अधिकाऱ्याने सांगितलं, “आज रामबन जिल्ह्यातील बैटरी चश्मा परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ते थेट खोल दरीत जाऊन पडलं. यात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं.

पोलिसांनी या घटनेची एफआयआर (प्राथमिकी) नोंदवली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू-श्रीनगर महामार्गाचा रामसू-रामबन विभाग भूस्खलनामुळे बंद आहे. अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून, महामार्गाची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, तरीही ४० किलोमीटर लांबचा रामबन-रामसू विभाग जवळपास ३०० किलोमीटर लांब असलेल्या या महत्त्वपूर्ण महामार्गाची कमकुवत कडी ठरत आहे.

हेही वाचा..

पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हाकलून देऊ

बांगलादेश सीमेलगत आरपीएफने कशी वाढवली गस्त

एनडीएमध्ये जागावाटपावर कोणताही वाद नाही

‘जर भारताने हल्ला केला तर मी इंग्लंडला पळून जाईन’

काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या सर्व नागरिक आणि सैनिकी पुरवठ्यासाठी याच महामार्गाचा उपयोग होतो. हा रणनीतिक महामार्ग बंद झाला की, खोऱ्यात इंधन, अन्नधान्य व अन्य आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होतो. या दुःखद घटनेने डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या पुंछ दुर्घटनेची आठवण करून दिली. पुंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागाच्या बलनोई भागात भारतीय सैन्याचं वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळलं होतं, ज्यात ५ जवानांचा मृत्यू झाला होता आणि ५ गंभीर जखमी झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा