34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषअटल सेतू हा 'पिकनिक स्पॉट नाही'!

अटल सेतू हा ‘पिकनिक स्पॉट नाही’!

गाडी थांबवून फोटो शूट केल्यास एफआयआर दाखल, मुंबई पोलिसांचा इशारा

Google News Follow

Related

अटल सेतू, “एक पिकनिक स्पॉट नाही,” असे मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे.तसेच वाहने थांबवून जे लोक पुलावर फोटो काढत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) म्हणूनही ओळखला जाणारा, अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे.१२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

दरम्यान, पुलाच्या उद्घाटनानंतर नागरिकांसाठी हा मार्ग मोकळा करण्यात आला.परंतु काही लोक सेल्फी घेण्यासाठी आणि समुद्राच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी अटल सेतूवर आपली वाहने थांबवताना दिसले. काहींनी, खरं तर, पुलाच्या भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे प्राणघातक अपघात होऊ शकतात.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे लोकांनी पुलावर कचरा टाकला, हे सोशल मीडियावर समोर आलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये दिसत आहे.

मुंबई पोलिसांनी अशा गोष्टींवर लक्ष ठेवले आणि कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.अटल सेतूवर थांबणे आणि फोटो क्लिक करणे हे “बेकायदेशीर” असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गावर जो कोणी आपली गाडी उभी करेल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

शाही इदगाह मशिदीच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी कमिशनर नेमण्याच्या निर्णयाला स्थगिती

दहशतवादी पन्नूला आली पुन्हा धमकी देण्याची खुमखुमी!

गडचिरोली: नक्षलवाद्यांच्या छाताडावर बसून पोलिसांनी गरदेवाडात बांधली चौकी!

अयोध्येत आजपासून प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात!

मुंबई पोलिसांनी ट्विटकरत लिहिले की, आम्ही सहमत आहोत की, अटल सेतू नक्कीच ‘पाहण्यालायक’ आहे परंतु त्यावर थांबून फोटो क्लिक करणे हे बेकायदेशीर आहे.तुम्ही MTHL वर गाडी थांबल्यास तुम्हाला एफआयआरचा सामना करावा लागेल, ”असे मुंबई पोलिसांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनेक लोकांचे फोटो देखील समोर आले आहेत, जे सेतू पुलावर आपल्या गाड्या उभ्याकरून फोटो शूट करत आहेत.तसेच काही लोक रेलिंगवर चढतानाही दिसत आहेत.अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून मुंबई पोलिसांकडून पाऊल उचलण्यात येत आहे.आता जर कोणी अटल सेतू मार्गावर गाडी उभी करून फोटो शूट करत असले तर त्याला आता मुंबई पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा