ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला जमैका येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ३ गडी राखून पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
सोमवारी टॉस हरल्यानंतर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करत ८ बाद १८९ धावा केल्या. ब्रँडन किंग ३२ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार शाय होप आणि रोस्टन चेज यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करत संघाला सावरले.
-
रोस्टन चेज – ३२ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह ६० धावा
-
शाय होप – ३९ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५५ धावा
-
शिमरोन हेटमायर – ३८ धावा
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने बेन ड्वारशुइस याने ४ विकेट्स घेतल्या.
ग्रीन-ओवनची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाचा झंझावात
१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांतच विजय मिळवला. एकवेळ त्यांचा स्कोअर ७८/४ होता. मात्र, तिथून कॅमेरून ग्रीन आणि मिचेल ओवन यांनी पाचव्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी करत विजयाचे समीकरण सोपे केले.
-
कॅमेरून ग्रीन – २६ चेंडूत ५ षटकार, २ चौकारांसह ५१ धावा
-
मिचेल ओवन – २७ चेंडूत ६ षटकारांसह ५० धावा (मॅन ऑफ द मॅच)
ऑस्ट्रेलियाने ७ चेंडू राखून सामना जिंकला.
वेस्ट इंडीजचे गोलंदाज:
-
जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती – प्रत्येकी २ विकेट्स
-
अकील हुसैन – १ विकेट
पुढचा सामना:
टी२० मालिकेतील दुसरा सामना २३ जुलैला जमैका येथे होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने टेस्ट मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केलेला आहे.







