28.8 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरविशेषकॅमेरूनचा ‘कॅमेरा ऑन’... आणि विंडीज ऑफ!

कॅमेरूनचा ‘कॅमेरा ऑन’… आणि विंडीज ऑफ!

Google News Follow

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजला जमैका येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात ३ गडी राखून पराभूत करत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

सोमवारी टॉस हरल्यानंतर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करत ८ बाद १८९ धावा केल्या. ब्रँडन किंग ३२ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार शाय होप आणि रोस्टन चेज यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करत संघाला सावरले.

  • रोस्टन चेज – ३२ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह ६० धावा

  • शाय होप – ३९ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५५ धावा

  • शिमरोन हेटमायर – ३८ धावा

ऑस्ट्रेलियाच्या बाजूने बेन ड्वारशुइस याने ४ विकेट्स घेतल्या.

ग्रीन-ओवनची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाचा झंझावात

१९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांतच विजय मिळवला. एकवेळ त्यांचा स्कोअर ७८/४ होता. मात्र, तिथून कॅमेरून ग्रीन आणि मिचेल ओवन यांनी पाचव्या गड्यासाठी ८० धावांची भागीदारी करत विजयाचे समीकरण सोपे केले.

  • कॅमेरून ग्रीन – २६ चेंडूत ५ षटकार, २ चौकारांसह ५१ धावा

  • मिचेल ओवन – २७ चेंडूत ६ षटकारांसह ५० धावा (मॅन ऑफ द मॅच)

ऑस्ट्रेलियाने ७ चेंडू राखून सामना जिंकला.

वेस्ट इंडीजचे गोलंदाज:

  • जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, गुडाकेश मोती – प्रत्येकी २ विकेट्स

  • अकील हुसैन – १ विकेट

पुढचा सामना:

टी२० मालिकेतील दुसरा सामना २३ जुलैला जमैका येथे होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने टेस्ट मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केलेला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा