27.9 C
Mumbai
Tuesday, August 11, 2026
घरविशेषफुकेत-दिल्ली विमानातील ऑटोपायलट बंद, हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड

फुकेत-दिल्ली विमानातील ऑटोपायलट बंद, हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड

एअर टरब्युलवन्सचं कारण आलं समोर

Google News Follow

Related

थायलंडमधील फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या एअरबस ए-३२० विमानाची हवेत अचानक सुमारे ३०० फूट उंची कमी झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ४ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेत विमानाचा ऑटोपायलट अचानक बंद झाला, तर हायड्रॉलिक यंत्रणेत तिहेरी बिघाड झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत १७ प्रवासी आणि क्रू सदस्य जखमी झाले.

एअर इंडियाच्या एआय२३७९ या विमानात १३७ प्रवासी आणि ८ क्रू सदस्य होते. प्रवासादरम्यान ऑटोपायलट डिस्कनेक्ट झाल्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण मॅन्युअली घेतले. त्यानंतर फ्लाइट-कंट्रोल यंत्रणेशी संबंधित ‘स्टॉल’ संदेश दिसून आला. काही इंडिकेटर स्विचही काही काळ बंद झाले. याचदरम्यान विमानाला सुमारे ५ मिनिटे टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.

या घटनेत ४ केबिन क्रू सदस्यांसह १७ जण जखमी झाले. काही क्रू सदस्यांना मान आणि मणक्याला दुखापत झाली. काही प्रवाशांनी विमान अचानक खाली आल्याचा अनुभव सांगितला असून एका प्रवाशाला बरगडीला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ही घटना ‘गंभीर घटना’ म्हणून वर्गीकृत केली आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB)कडून ICAO अॅनेक्स-१३ अंतर्गत तपास सुरू आहे. विमानाचा फ्लाइट डेटा, कॉकपिट रेकॉर्डिंग आणि विविध तांत्रिक यंत्रणांची तपासणी केली जात आहे. तपासात एअरबसचे तज्ज्ञ आणि फ्रान्सच्या विमान अपघात तपास यंत्रणेची BEA टीमही मदत करणार आहे.

हे ही वाचा:

पीओकेमधील हिंसक आंदोलनानंतर पाक सरकार बॅकफूटवर; चर्चेची तयारी

राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का?

स्लोव्हेनियातील भारतीय दूतावासाच्या परिसराचे नुकसान; भारताकडून तीव्र निषेध

झारखंड आंदोलनाच्या बातम्या करणाऱ्या पत्रकार अमन चोप्रांवर एफआयआर

दरम्यान, दोन्ही वैमानिकांची नियमानुसार सायकोअॅक्टिव्ह पदार्थांची तपासणी करण्यात आली. पायलट-इन-कमांडच्या सुरुवातीच्या चाचणीच्या निकालासाठी पुढील विश्लेषण आवश्यक असल्याने नमुना अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत दोन्ही वैमानिकांना उड्डाणाच्या ड्युटीपासून दूर ठेवण्यात आले आहे. विमानाची उंची अचानक कमी होण्यामागे ऑटोपायलट, हायड्रॉलिक यंत्रणेतील बिघाड आणि इतर तांत्रिक समस्या यांचा नेमका काय संबंध होता, हे AAIBच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा