उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात सोमवारी झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन भाविकांचा करंट लागून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. घटनास्थळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी सांगितले की, काही माकडांनी विजेच्या तारेवर उड्या मारल्यामुळे तार तुटून मंदिराच्या टिनशेडवर पडली. त्यामुळे संपूर्ण परिसरात विद्युतप्रवाह पसरला आणि हा अपघात घडला. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातानंतर २९ जखमी भाविकांना अॅम्ब्युलन्सद्वारे हैदरगड सीएचसीत आणले. त्यापैकी ९ जणांना त्रिवेदीगंज आणि ६ जणांना कोठी सीएचसी येथे पाठवण्यात आले. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा..
चीनमध्ये भूस्खलनात चार जणांचा मृत्यू, आठ जण बेपत्ता
शेअर बाजारात सेवी इन्फ्राची जोरदार एन्ट्री, आयपीओ गुंतवणूकदार नफ्यात
१६२ परदेश दौरे, २५ बनावट कंपन्या, ३०० कोटी रुपयांचा घोटाळा!
बिहारमधील गुंड डब्ल्यू यादवचा एन्काउंटर!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकीमधील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाइकांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींच्या योग्य उपचारासाठी आणि मदत व बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.







