पाकिस्तानवर ‘ब्लॉक’ स्ट्राईक; क्रिकेट कर्णधार रिझवान, बाबर आझम, शाहीन आफ्रिदीचे अकाउंट बंद!

पहलगाम हल्ल्यानंतर कारवाई

पाकिस्तानवर ‘ब्लॉक’ स्ट्राईक; क्रिकेट  कर्णधार रिझवान, बाबर आझम, शाहीन आफ्रिदीचे अकाउंट बंद!

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानच्या प्रत्येक प्रमुख खेळाडू, नेत्यांवर आणि संस्थेवर कारवाई करत आहे. सुरुवातीला भारतात या खेळाडूंच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आणि आता अनेक दिग्गज खेळाडूंचे इंस्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

गुरुवारी (१ मे) ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाउंट देखील भारतात प्रतिबंधित  करण्यात आले. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. भारतासह अनेक देशांनी दहशतवाद्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. एकीकडे हल्ल्यावरून संतापाची लाट असताना शाहीन आफ्रिदी, जुनैद खान सारख्या खेळाडूंनी भारताची खिल्ली उडवली होती.

हे ही वाचा  : 

‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली असलेल्या लोकांची नसबंदी करा!

पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे युट्युब अकाउंट भारतात ब्लॉक

डॉलरच्या तुलनेत रुपया चमकला, सात महिन्यांतली उच्चतम पातळी गाठली!

नाले सफाई आणि अंतर्गत रस्त्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण करा!

यानंतर, भारत सरकारने पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यास सुरुवात केली. शोएब अख्तर, बासित अली यांचे यूट्यूब अकाउंट, पाकिस्तानी न्यूज चॅनेल आणि पाकिस्तानी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनेल देखील बंदी घालण्यात आली. भारताच्या या कृतीनंतर, पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटपटूंना खूप नुकसान होणार आहे कारण त्यांना भारतातूनही खूप व्ह्यूज मिळत होते.

विशेष म्हणजे, भारताने या कारवाईत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना देखील सोडले नाही. भारताने पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे अधिकृत युट्युब अकाउंट ब्लॉक केले आहे.
Exit mobile version