29.7 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरविशेष'लव्ह जिहाद'च्या आरोपाखाली असलेल्या लोकांची नसबंदी करा!

‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली असलेल्या लोकांची नसबंदी करा!

भोपाळचे भाजप खासदार आलोक शर्मा यांची सरकारकडे मागणी

Google News Follow

Related

हिंदू विद्यार्थ्यांना टार्गेट करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर भोपाळचे भाजप खासदार आलोक शर्मा यांनी “लव्ह जिहाद”चा आरोप असलेल्या व्यक्तींची नसबंदी करण्याची मागणी केली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पहिल्यांदाच झालेले खासदार आणि भोपाळचे माजी महापौर असलेले आलोक शर्मा म्हणाले, “लव्ह जिहाद प्रकरणात पकडलेल्यांची नसबंदी सरकारने करावी.” त्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करत म्हटले की, “अशा घटना कुठेही कळतील तर मला थेट फोन करा. गरज पडल्यास ताबडतोब पोलिस ठाण्यांना घेराव घाला.”

भविष्यात कठोर कारवाईचा इशारा देत खासदार शर्मा म्हणाले, “जर कोणी असे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पूर्वी कधीही न झालेले परिणाम भोगावे लागतील.

गेल्या महिन्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघडकीस आले होते. ही टोळी हिंदू महिलांशी मैत्री करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून घ्यायची. यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायचे. काही महिलांवर धर्मांतर करण्यासाठी दबावही आणला जात असे. दरम्यान, अशा प्रकारची गंभीरता लक्षात घेता शहराच्या पोलिस आयुक्तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.

हे ही वाचा : 

पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे युट्युब अकाउंट भारतात ब्लॉक

डॉलरच्या तुलनेत रुपया चमकला, सात महिन्यांतली उच्चतम पातळी गाठली!

दिल्ली उच्च न्यायालयाकडून साकेत गोखलेला धक्का

“भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने ईशान्येकडील राज्ये ताब्यात घ्यावीत”

दरम्यान, देशासह राज्यभरात अशी ‘लव्ह जिहाद’ची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, येत आहेत. विविध हिंदू संघटनांकडून याविरुद्ध आवाज उठवत हिंदू मुलींना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा