देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशा घटनांना बळी पडू नये यासाठी विविध हिंदू संघटनांकडून हिंदू महिलांना जागृत राहण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी विविध मोहीम राबवली जात आहेत. अशातच नवरात्रीचा उत्सव सुरू असताना अशा घटना घडू नये, यासाठी संघटनांकडून खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील एका गरबा मंडपाने “लव्ह जिहाद” बद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. “बहिणी, दुर्गा, काली किंवा झाशीची राणी हो, पण कधीही लव्ह जिहादची शिकार होवू नको” असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
दुसऱ्या पोस्टरमध्ये लिहिले आहे, “जर तुम्हाला जगायचे असेल तर काली (माता) म्हणून जगा.” महिला आणि मुलींना लव्ह जिहादपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. बिगर-हिंदू पुरुषांनाही मंडपमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गरबा मंडपाच्या सदस्यांचे म्हणणे आहे की या पोस्टर्सचा उद्देश मंडपमध्ये येणाऱ्या महिला आणि मुलींना सावध करणे आणि सामाजिक दुष्कृत्यांपासून त्यांचे रक्षण करणे आहे.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने नागपूरमधील गरबा मंडपांच्या प्रवेशद्वारांवर भगवान विष्णूच्या ‘वराह अवतार’ दर्शविणाऱ्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. या मंडपांमध्ये प्रवेश करणाऱ्यांना प्रतिमेला नमस्कार करून पूजा केल्यानंतरच आत प्रवेश दिला जात आहे. विहिंपच्या धर्म प्रसार विभागाचे विदर्भ प्रमुख राजकुमार शर्मा यांनी सांगितले की, गैर-हिंदूंना गरबा मंडपांमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, कपाळावर टिळक घालणे आणि प्रवेशासाठी संरक्षक धागा बांधणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा :
छत्तीसगड: १४ लाख रुपयांचे बक्षीस असलेले तीन नक्षली ठार!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांत महिलांचे महत्त्वाचे योगदान
टीव्हीके रॅलीत ४० जणांचा मृत्यू, विजयच्या वरिष्ठ सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल!
जैश, लश्कर आणि हिजबुलवर पाकिस्तान सैन्याचं थेट नियंत्रण
विश्व हिंदू परिषदेचा असा विश्वास आहे की हा उपक्रम लव्ह जिहाद रोखण्यासाठी आहे. त्यांचे म्हणणे आहे की वराह अवताराच्या प्रतिमा लावल्याने फक्त हिंदूंनाच मंडपांमध्ये प्रवेश मिळेल.







