22 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरविशेषबीड जन्म प्रमाणपत्र घोटाळा, २७०२ प्रमाणपत्र रद्द!

बीड जन्म प्रमाणपत्र घोटाळा, २७०२ प्रमाणपत्र रद्द!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची माहिती 

Google News Follow

Related

बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांचा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे समोर आले, येत आहे. आतापर्यंत अनेक घुसखोरांना पकडून त्यांना देशातून हाकलण्यात आले आहे. अशा घुसखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरूच आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणात अशी घुसखोरी झाली असून या लोकांना बेकायदेशीर जन्मप्रमाणपत्र दिल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजपा नेत्याने आवाज उठवल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये जन्मप्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली आहे, संशयित जन्म प्रमाणपत्रे रद्द केली गेली आहेत. याच दरम्यान, बीडमध्ये देखील जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कार्यालयाकडून २७०२ प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. सोशल मिडियावर पोस्टकरत किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे.

काल (२५ ऑगस्ट) बीड आणि जालना येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकाऱ्या सोबत बैठक झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले. याभेटीनंतर बीड जिल्ह्यात नायब तहसीलदारांनी बेकायदेशीर रित्या दिलेले २७०२ प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यापैकी १६९८ मूळ ओरिजिनल  प्रमाणपत्र परत घेण्यात आले असून राहिलेले १००४ प्रमाणपत्र १५ दिवसात परत घेतले जाणार असल्याचे सोमय्या यांनी पोस्टमध्ये सांगितले. 

हे ही वाचा : 

२६ फूट उंच सफरचंद गणेशमूर्ती कुठे आहे बघा..

जीतू पटवारी यांच्या वक्तव्यावर सुधांशु त्रिवेदी भडकले

पंतप्रधान मोदी शिखर बैठक, एससीओ बैठकीत सहभागी होणार

हेड कॉन्स्टेबलला लाख रुपयांची लाच घेताना अटक

यासह त्यांनी आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व अचलपूर येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पोलीसांची एसआयटी स्थापन झाल्याची माहिती दिली. पोस्टमध्ये म्हटले, माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने बनावटी कागदपत्रे, खोटे शपथपत्राद्वारे फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या अर्जदारांवर/ जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या संदर्भात अंजनगाव सुर्जी व अचलपूर येथे ३ FIR/ गुन्हे दाखल झाले आहेत. याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातील अमरावती पोलिसांनी विशेष तपास पथक (Special Investigation Team) नियुक्त केले आहे. सदर तपास पथकाचे प्रमुख नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक राहणार आहेत.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा