37 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरविशेषबेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?

बेन स्टोक्सचा क्रिकेटला अलविदा?

Google News Follow

Related

क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता केवळ ४ दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे.

बेन स्टोक्सने अचानक क्रिकेट मालिकेतून नाव माघार तर घेतलंच, पण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मानसिक स्वास्थ्य आणि बोटाला झालेली दुखापत यामुळेही स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याची चर्चा आहे. यंदा आयपीएल २०२१ दरम्यान स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. कॅच घेताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं. दरम्यान, इंग्लंड बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, बेन स्टोक्सने भारताविरुद्ध पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी तो घेत आहे. शिवाय त्याच्या बोटालाही दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा आदर करतो.”

हे ही वाचा:

चीन आज सैन्य मागे घेणार?

सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

पॅकेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वाजवली जुनीच टेप! म्हणाले…

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

दरम्यान, भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी क्रेग ओव्हरटनचा संघात समावेश केला आहे. ज्या १७ जणांचा संघ जाहीर केला होता, त्यामध्ये स्टोक्सचा समावेश होता. आता त्याच्या जागी क्रेग ओव्हटरनचा समावेश करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा