30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरविशेषलाभार्थी हिंदू, ताबा बांगलादेशींकडे? म्हाडाच्या ११० घरांवरून वाद

लाभार्थी हिंदू, ताबा बांगलादेशींकडे? म्हाडाच्या ११० घरांवरून वाद

किरीट सोमय्यांकडून चौकशीची मागणी

Google News Follow

मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या घरांच्या वाटपावरून नवा वाद निर्माण झाला आहे. म्हाडाच्या अल्प उत्पन्न गट (LIG) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) राखीव असलेले ११० फ्लॅट बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घरांसाठी मूळ अर्ज हिंदू नागरिकांच्या नावाने करण्यात आले होते. मात्र, पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून या घरांचा ताबा बांगलादेशी नागरिकांकडे गेल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पुराव्यांसह म्हाडा प्रशासन आणि संबंधित मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, अँटॉप हिलमधील नूराबाजार परिसरातील म्हाडा वसाहतीमधील ५० हून अधिक रहिवाशांनी त्यांच्या मुलुंड येथील कार्यालयात भेट घेतली होती. या रहिवाशांनी अतिक्रमण, बेकायदेशीर व्यवहार आणि गुंडगिरीसह विविध समस्यांची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली. मूळ लाभार्थ्यांच्या नावावर घरांचे वाटप झाले असले, तरी प्रत्यक्षात अन्य व्यक्ती या घरांमध्ये राहत असल्याचा त्यांचा दावा आहे.

यासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी या प्रकरणातील काही उदाहरणेही दिली आहेत. त्यामध्ये अविनाश रविधोने यांच्या नावावर मूळ सदनिका असून, त्या ठिकाणी मन्सुरी जुनेद मोहम्मद राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रमेश घाटाळ यांच्या सदनिकेत शकील अहमद सिद्दिकी, श्याम राऊतेकर यांच्या सदनिकेत नसरीन रमजान शेख, तर मनोज खांबे यांच्या सदनिकेत मुनीरा रिझवान राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा प्रकारे मूळ सदनिकाधारक आणि सध्या वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची काही नावे सोमय्या यांनी जाहीर केली आहेत.

१४ नोव्हेंबरला प्रत्यक्ष पाहणी करणार

या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच गृहनिर्माण विभागाकडेही चौकशीची मागणी केली आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी ते अँटॉप हिल परिसरातील संबंधित म्हाडा वसाहतीची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

ईशान्य भारतातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव

मूडीजकडून भारताच्या आर्थिक विकासदराचा अंदाज वाढवला

मॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

“जशी वेळ येईल, तशा गोष्टी समजतील!”

दरम्यान, म्हाडाच्या नियमानुसार घरांच्या हस्तांतरणावर आणि भाड्याने देण्यावर निर्बंध आहेत. घर भाड्याने देण्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक आहे. तसेच काही घरांच्या बाबतीत पाच ते दहा वर्षांचा विक्रीबंदीचा कालावधी लागू असतो. त्यामुळे या प्रकरणात नियमांचे उल्लंघन झाले आहे का, तसेच सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा कोणाकडे आहे, याची अधिकृत चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा