34 C
Mumbai
Sunday, March 22, 2026
घरविशेषभीमाशंकर- कल्याण एसटी बस उलटून अपघात, पाच जखमी

भीमाशंकर- कल्याण एसटी बस उलटून अपघात, पाच जखमी

बस २० फूट खोल दरीत कोसळली

Google News Follow

Related

भीमाशंकर- कल्याण एसटी बस उलटून २० फूट खोल खाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. अपघातातील जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात भीषण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर येथे जाणारी एसटी बस एमएच १४ बीटी १५८२ ही आंबेगाव तालुक्यातील गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून बस थेट २० फूट खोल खाली कोसळल्याची घटना गुरुवार, १३ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवासी जखमी झाले. तर अन्य काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचत जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असल्याची माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिली. प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळाल्याने पुढील दुर्घटना टळली आहे.

हे ही वाचा:

‘ओएमजी २’चा ‘आदिपुरुष’ होऊ नये म्हणून सेन्सॉर बोर्ड आधीच सज्ज

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर बच्चू कडून भूमिका स्पष्ट करणार

ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत सापाची हजेरी!

दरम्यान, बुधवारी सकाळी सप्तश्रृंगी गडावरून खाली उतरत असलेली एसटी बस ४०० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला होता. त्यात एका महिलेचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले होते. त्यामुळे दोन दिवसात एसटी बस अपघाताची ही दुसरी घटना आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा