32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषशेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा

Google News Follow

Related

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने नव्या योजनेची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

आज, २० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. साडेचार हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचे देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले आहे. तसेच कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

योजनेबद्दल माहिती डेटनं फडणवीस म्हणाले, शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. ज्यामुळे शेतीत नुकसान झाल्यावर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाणार आहे. लवकरात लवकर अशा प्रकारची प्रणाली उभारली जाणार आहे.

हे ही वाचा:

यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ

पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

या दीड महिन्यांत सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहचली आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा