30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरविशेषआज उघडणार मराठी बिग बॉसच्या घराचे दार

आज उघडणार मराठी बिग बॉसच्या घराचे दार

Related

बहुचर्चित आणि लोकप्रिय असा टेलिव्हिजन रियालिटी शो असणाऱ्या मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दोन यशस्वी पर्वांच्या नंतर मराठी बिग बॉसचे हे तिसरे पर्व सुरू होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या पर्वाची वाट बघत असून यावेळी बिग बॉसच्या घरात नेमके कोण सेलिब्रिटी स्पर्धक असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

बिग बॉस हा रिॲलिटी शो हा गेल्या काही वर्षांतला सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रियालिटी शो आहे. हिंदी मध्ये या शोचे अनेक सीजन झाले असून काही वर्षांपासून प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. मराठीतील बिग बॉस स्पर्धेलाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसली आहे. त्यामुळे आज म्हणजेच रविवार १९ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या खेळाच्या तिसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांची पसंती लाभणार यात शंका नाही.

हे ही वाचा:

आयपीएलचा पुनःश्च हरी ओम

पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सोनीयांची सोनींना पसंती?

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

१५ पेक्षा अधिक सेलिब्रिटी हे १०० पेक्षा अधिक दिवस एका घरात एकत्र राहणार आहेत. त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात येणार असून दर आठवड्याला एक सेलिब्रिटी स्पर्धक खेळातून बाहेर पडणार आहे. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे हे ठरवले जाणार आहे. यंदाच्या बिग बॉसच्या घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

तर दुसरीकडे या खेळात सहभागी होणाऱ्या संभाव्य स्पर्धकांची यादी ही बाहेर आली आहे. मराठी बिग बॉसमध्ये गायत्री दातार, सुरेखा कुडची, नेहा जोशी, शाल्मली खोलगडे, आनंद इंगळे, चिन्मय उदगीकर, पल्लवी सुभाष, नक्षत्रा मेढेकार, भाग्यश्री लिमये हे स्पर्धक सहभागी होणार असल्याचे समजत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,511अनुयायीअनुकरण करा
4,870सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा