29 C
Mumbai
Wednesday, September 16, 2026
घरविशेषबिहारमध्ये गंगा नदीचा रौद्रावतार

बिहारमध्ये गंगा नदीचा रौद्रावतार

१३ जिल्ह्यांत महापुराचे संकट

Google News Follow

Related

बिहारमध्ये पुराची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून गंगा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. गंगेची पाणीपातळी २०१६ मध्ये नोंदवलेल्या विक्रमी पातळीपेक्षाही वर गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गंगेबरोबरच राज्यातील इतर नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत असल्याने अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले असून रस्ते आणि संपर्कमार्ग पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागत आहे.

पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहार सरकारने १३ जिल्ह्यांसाठी १३ मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. बक्सर, भोजपूर, पटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, समस्तीपूर, लखीसराय, खगडिया, मुंगेर, भागलपूर, कटिहार आणि अरवल या जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत. मदत आणि बचावकार्य वेगाने राबवणे, पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि सरकारी मदत योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचते आहे की नाही, यावर हे मंत्री लक्ष ठेवणार आहेत.

हे ही वाचा:
मोदींचा टोला…लाल किल्ल्यावरून दिली ‘दिमागी नक्षल’ची होमिओपॅथिक गोळी

‘हनुमान अंश’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

राज ठाकरे म्हणतात, गणेशोत्सवात दंगली घडवल्या जाणार!

गणेशोत्सवातील डीजेविरोधात पुणेकर रस्त्यावर उतरले!

दरम्यान, गंगेच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पटणा आणि आसपासच्या भागांमध्ये विशेष खबरदारी घेतली जात आहे. संवेदनशील भागांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत असून बचाव पथके आणि बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांसाठी अन्न, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, पाण्याचा वाढता वेग आणि विस्तार पाहता आगामी काळात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा