29.6 C
Mumbai
Thursday, October 8, 2026
घरविशेषअजनार नदीपासून यमुनेपर्यंत ‘बिट्टू तबाही’ची स्वच्छता मोहीम

अजनार नदीपासून यमुनेपर्यंत ‘बिट्टू तबाही’ची स्वच्छता मोहीम

साडेचार तासांत ५८५ किलो कचरा हटवला

Google News Follow

Related

नदी स्वच्छतेसाठी स्वतः पुढाकार घेतलेल्या मध्य प्रदेशातील २१ वर्षीय सुरेंद्र सिंह चौधरी ऊर्फ ‘बिट्टू तबाही’ याच्या मोहिमेची व्याप्ती आता यमुना नदीपर्यंत पोहोचली आहे. राजगड जिल्ह्यातील अजनार नदीतील कचरा हटवून चर्चेत आलेल्या बिट्टूने ‘वर्ल्ड क्लीनअप डे’च्या निमित्ताने यमुना नदीकाठ स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी बिट्टू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी साडेचार तासांच्या श्रमांनंतर यमुनेच्या किनाऱ्यावरून तब्बल ५८५ किलो कचरा हटवला.

यमुना नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, पूजेचे साहित्य, निर्माल्य, हार आणि इतर टाकाऊ वस्तू साचल्या होत्या. बिट्टू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत स्थानिक नागरिकांनीही त्याला सहकार्य केले. बिट्टूने या स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

बिट्टूच्या नदी स्वच्छतेच्या मोहिमेची सुरुवात मध्य प्रदेशातील अजनार नदीपासून झाली. राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथील विद्यार्थी असलेल्या बिट्टूला नदीकाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, शेवाळ आणि चिखल साचल्याचे दिसून आले. पाण्यातून दुर्गंधीही येत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्याने २६ जानेवारी २०२६ रोजी नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही मित्र त्याच्यासोबत होते; मात्र पुढे त्याने ही मोहीम एकट्यानेच सुरू ठेवली.

विशेष उपकरणे किंवा पुरेशी सुरक्षा साधने नसतानाही तो नदीत उतरून हाताने कचरा बाहेर काढत होता. या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च त्याने स्वतःच्या बचतीतून केला. कामादरम्यान त्याला हात-पायांमध्ये संसर्ग, त्वचेची खाज यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागले. नदीतील कचरा काढताना सापांचाही सामना झाला.

हे ही वाचा:

तुर्कीने भारताकडून अमेरिका, रशियापेक्षाही खरेदी केले विक्रमी डिझेल

यूपीआयच्या ९६% पेमेंट्सवर कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

पुढील दशकात भारताची अर्थव्यवस्था तिप्पट होणार?

थायलंडला नमवत भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक!

त्याच्या कामाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेदरलँड्समधील ‘द ओशन क्लीनअप’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बोयान स्लॅट यांनी त्याच्या कामाची दखल घेतली. अजनार नदी स्वच्छ करण्यापूर्वी आणि नंतरचे फोटो असलेली पोस्ट पाहिल्यानंतर स्लॅट यांनी ‘एक्स’वरून बिट्टूला संस्थेसोबत काम करण्याची ऑफर दिली. अजनार नदीपासून सुरू झालेली ही मोहीम आता यमुनेपर्यंत पोहोचली असून, यमुना स्वच्छता अभियान सलग तीन दिवस चालणार आहे. त्यानंतर गुरुग्राममधील खेडकी दौला हे बिट्टूच्या मोहिमेचे पुढील ठिकाण असणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा