23 C
Mumbai
Wednesday, January 7, 2026
घरविशेषकोलकाता: 'अल्लाह हू अकबर' म्हणण्यास नकार दिल्याने हिंदू महिलांवर हल्ला!

कोलकाता: ‘अल्लाह हू अकबर’ म्हणण्यास नकार दिल्याने हिंदू महिलांवर हल्ला!

भाजपाचा आरोप  

Google News Follow

Related

“अल्लाह हू अकबर” म्हणण्यास नकार दिल्याने मुस्लिम मुलींच्या एका गटाने हिंदू महिलांवर शारीरिक हल्ला केल्याचा आरोप भाजपाच्या बंगाल युनिटने सोमवारी (४ ऑगस्ट) केला. भाजपाने एक्सवर अपलोड केलेल्या व्हिडीओ एक महिला घटनेची माहिती देताना दिसत आहे. कोलकाता पोलिसांचे सहआयुक्त (मुख्यालय) आयपीएस मीराज खालिद यांनी सांगितले, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

पोस्टनुसार, ही घटना कोलकात्यातील धाकुरिया तलावात घडली. पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, “अल्लाह हू अकबर” म्हणण्यास नकार दिल्याने काही मुस्लिम मुलींनी हिंदू महिलांच्या एका गटावर शारीरिक हल्ला केला.  त्यावेळी हिंदू महिला शांतपणे म्हणाल्या, “हे सार्वजनिक ठिकाण आहे, धार्मिक ठिकाण नाही. तुम्ही आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, आम्ही हिंदू आहोत,” तेव्हा त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याबद्दल त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

“पश्चिम बंगालमध्ये धार्मिक सलोखा असा दिसतो का? आपण बांगलादेशात आहोत की पाकिस्तानात?” असा प्रश्न भाजपने पोस्टमध्ये विचारला आहे. दरम्यान, या कथित घटनेला उत्तर देताना, कोलकाता पोलिसांचे सहआयुक्त (मुख्यालय) आयपीएस मीराज खालिद यांनी इंडिया टुडेला सांगितले की, पोलिसांना सोशल मीडियाद्वारे या घटनेची माहिती मिळाली आणि आतापर्यंत कोणत्याही पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

“आम्हाला या कथित घटनेची माहिती सोशल मीडियावरून मिळाली आहे. आतापर्यंत कोणीही कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली नाही. सत्य उघड करण्यासाठी सविस्तर चौकशी केली जात आहे,” असे आयपीएस मीराज खालिद यांनी इंडिया टुडेला सांगितले.

हे ही वाचा : 

जम्मू-काश्मीर: पाचव्या दिवशीही शोधमोहीम सुरु, अधूनमधून गोळीबार सुरूच!

महुआ मोईत्रा यांच्या ‘डुक्कर’ या टीकेनंतर, कल्याण बॅनर्जी यांची संतप्त पोस्ट अन राजीनामा!

लाल किल्ल्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ बांगलादेशींना अटक!

रशियाकडून तेल खरेदी; भारताने अमेरिकेला सुनावले

दरम्यान, कोलकाता पोलिसांच्या एका सूत्राने इंडिया टुडेला सांगितले की, उपलब्ध स्रोतांद्वारे तक्रारदाराची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच कोणतीही लेखी तक्रार दाखल न झाल्याने प्रक्रियेला वेळ लागत आहे. एकदा तिची ओळख पटली की, तिला चौकशीसाठी बोलावले जाईल आणि जर घटनेची पुष्टी झाली तर औपचारिक गुन्हा दाखल केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा