स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला आज (१३ ऑगस्ट) देशभरातील नागरिकांमध्ये उत्फुर्स प्रतिसाद पहायला मिळाला. सत्ताधारी नेत्यांसह नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवला. देशभरात भाजपाच्या नेत्यांकडून रॅली देखील काढण्यात आली. याच पार्श्वभूमीवर बिहारच्या पाटण्यात भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्याकडून रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते, यावेळी ‘भारत माता कि जय’च्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला. दरम्यान, यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, “…आम्ही हातात तिरंगा घेऊन आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत रस्त्यावर उतरलो आहोत, पण प्रश्न असा आहे की फक्त आम्हीच का उतरलो आहोत? काही लोक SIR साठीच रस्त्यावर उतरतात, त्यांना असं वाटत नाही का की त्यांनाही देशासाठी पुढे यायला हवं… राहुल गांधी आणि तेजस्वी यादवला विचारा. ते फक्त आपल्या पक्षासाठी आणि मतांसाठीच जगतात, पण आम्ही भाजपचे लोक देशासाठी जगतो.”
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी राज्याच्या राजधानीत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची सुरुवात केली आणि ते राष्ट्रीय अभिमानाचे आणि स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि सैनिकांबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे म्हटले. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी कालिदास मार्गावर आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा :
कोंबडी खायला मिळत नाही, हेच राहुल गांधी यांचे दु:ख
एफपीओ व सहकारी संस्थांना का मिळणार अनुदान?
राहुल आणि तेजस्वी काहीही नाटक करू शकतात!
‘पाकिस्तानने मुर्खासारखे बोलू नये, आमच्याकडे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे’
ते म्हणाले, ‘आपला देश स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण करत आहे आणि अमृत काळात प्रवेश करत आहे. प्रत्येक भारतीयाला संविधान, राष्ट्रीय प्रतीके, महान क्रांतिकारक आणि व्यक्तिमत्त्वांबद्दल आदर आणि समर्पणाची भावना असली पाहिजे. गेल्या १० वर्षांत, पंतप्रधानांच्या आवाहनावरून, राष्ट्रवादाची ही भावना प्रत्येक घरात पोहोचत आहे आणि हर घर तिरंगा अभियानाद्वारे, आपण ती भरभराट होताना पाहत आहोत.’
#WATCH | Patna: BJP MP Ravi Shankar Prasad says, "…we have come out with the tricolour in our hands and slogans of Bharat Mata Ki Jai, but the question is why only we come out, there are some people who come out for SIR, don't they feel that they should also come out… Ask… pic.twitter.com/d4kJTt5A9B
— ANI (@ANI) August 13, 2025







