31 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषकेजरीवालांना नोबेलची इच्छा, भाजपा म्हणाली- भ्रष्टाचारासाठी कसला नोबेल? 

केजरीवालांना नोबेलची इच्छा, भाजपा म्हणाली- भ्रष्टाचारासाठी कसला नोबेल? 

भाजपा नेते वीरेंद्र सचदेवा यांची जोरदार टीका 

Google News Follow

Related

नोबेल पुरस्कारावरून फक्त अमेरिकेतच नाही तर भारतातही राजकारण सुरू झाले आहे. अरविंद केजरीवाल यांनी नोबेल पुरस्कराची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, भाजपने केजरीवाल यांच्या या विधानावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने म्हटले की, जर नोबेल पुरस्कार भ्रष्टाचाराच्या श्रेणीत दिला असता तर केजरीवाल यांना संधी मिळू शकली असती, परंतु नोबेल समिती या श्रेणीत कोणताही पुरस्कार देत नाही.

चंदीगडमध्ये द केजरीवाल मॉडेल या पुस्तकाच्या पंजाबी आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना आपचे प्रमुख म्हणाले, दिल्लीतील त्यांच्या सरकारच्या कामात अडथळा आणण्याचे वारंवार प्रयत्न करूनही, त्यांच्या प्रशासनाने प्रभावीपणे काम केले आहे. “काम करण्यापासून रोखले गेले असले तरी, आम्ही कामगिरी केली. विविध अडचणी असतानाही इतके काम केल्याबद्दल मला आणि माझ्या प्रशासनाला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे,” असे केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांच्या विधाननंतर भाजपाने त्यांची खिल्ली उडवली. दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी केजरीवाल यांच्यावर वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतःची प्रशंसा करण्याचा आरोप केला. “केजरीवाल यांनी स्वतःसाठी नोबेल पुरस्काराची मागणी करणे हास्यास्पद आहे. जर अक्षमता, अराजकता आणि भ्रष्टाचाराच्या श्रेणी असती तर त्यांना निश्चितच नोबेल पुरस्कार मिळाला असता,” असे सचदेवा म्हणाले.

हे ही वाचा :

पाच देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी भारतात परतले! 

हरियाणात ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले!

ज्ञानाचे अमृतकुंभ असे माझे गुरू डॉ. भटकर, डॉ. माशेलकर!

”मी हिंदू आहे” कावड मार्गावरील दुकानांवर झळकले पोस्टर्स!

ते पुढे म्हणाले, आम आदमी पक्षाच्या नेत्याने त्यांच्या १०-११ वर्षांच्या कारकिर्दीत दिल्लीला फक्त घोटाळेच दिले. म्हणूनच जनतेने त्यांना शिक्षा केली आणि २०२५ मध्ये त्यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. पण त्यांचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करत केजरीवाल आता स्वतःसाठी नोबेल पुरस्काराची मागणी करत आहेत, जे लज्जास्पद आहे.

भाजप नेत्याने आरोप केला की अरविंद केजरीवाल हे परदेशी निधी घेऊन देशाविरुद्ध काम करत आहेत. त्यांनी आरोप केला की लोक केजरीवाल यांना देण्यात आलेल्या मॅगसेसे पुरस्काराकडे संशयाने पाहतात. यावरून त्यांची कार्यशैली कशी होती हे दिसून येते. पण आज त्यांची खरी प्रतिमा लोकांसमोर आली आहे.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा