पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या १७ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिहारमध्ये ‘सेवा पंधरवडा’ सुरू करण्यात आला आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितले की, “पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवाडा म्हणून साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज (१६ सप्टेंबर) पाटण्यातील गांधी मैदानावरून “चलो जीते हैं” नावाच्या रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.







