30 C
Mumbai
Sunday, October 13, 2024
घरविशेषदगडफेक करणाऱ्या जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हातात आता पुस्तकं, पेन दिसतायत

दगडफेक करणाऱ्या जम्मू- काश्मीरच्या लोकांच्या हातात आता पुस्तकं, पेन दिसतायत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे श्रीनगरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधन

Google News Follow

Related

जम्मू काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनी विधानसभा निवडणुका पार पडत असून या निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. यावेळी मतदानाचा नवा विक्रम रचला गेला. अशातच आता जम्मू- काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. तसेच जम्मू- काश्मीरमधील बदललेल्या स्थितीवरही त्यांनी भाष्य केले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, “किश्तवाडमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, डोडामध्ये ७१ टक्क्यांहून जास्त मतदान झाले, रामबनमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले अनेक जागांवर मतदानाचे रेकॉर्ड मोडले गेले. हा नवा इतिहास आहे. आज जग पाहतंय की जम्मू- काश्मीरमधील लोक भारताची लोकशाही कशी मजबूत करत आहेत आणि त्यासाठी जम्मू- काश्मीरच्या लोकांचे अभिनंदन करतो,” असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

“काही दिवसांपूर्वी मी जम्मू- काश्मीरमध्ये आलो तेव्हा मी म्हणालो होतो की, जम्मू- काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार आहेत आणि तेव्हापासून हे लोक घाबरले आहेत. या तिन्ही कुटुंबांना कोणत्याही मार्गाने सत्ता बळकावणे आणि नंतर सर्वांना लुटणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असे वाटते. जम्मू- काश्मीरमधील लोकांकडून त्यांचे हक्क हिरावून घ्यायचे हा त्यांचा राजकीय अजेंडा आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरला केवळ भीती आणि अराजकता दाखवली आहे. पण, आता जम्मू-काश्मीर या तीन कुटुंबांच्या ताब्यात राहणार नाही,” असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने दगडफेक आणि दहशतवादाशी सहानुभूती असलेल्या पक्षांना नाकारले आहे.

हे ही वाचा : 

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या?, सलमान खानच्या वडिलांना महिलेकडून धमकी !

लेबनॉन स्फोटातील उपकरणे जपानी कंपनीची; उत्पादने २०१४ मध्येचं बंद केल्याचा कंपनीचा दावा

वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात, तिरुपती मंदिराच्या लाडू प्रसादात जनावरांच्या चरबीचा वापर ?

लेबनॉन पुन्हा स्फोटांनी हादरलं; पेजर्सनंतर आता रेडिओ, वॉकीटॉकीमध्ये स्फोट

“येथील तीनही कुटुंबांनी इकडच्या तरुणांच्या हातात दगड सोपवला. स्वतःच्या फायद्यासाठी मुलांचे भविष्य उध्वस्त केले. पण, आपल्याला जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करायचे आहे आणि जम्मू- काश्मीरविरुद्ध कट करणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करायचे आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा हेतू आहे. या तीन कुटुंबांच्या हातून पुढची पिढी बरबाद होऊ देणार नाही. संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. मुलांच्या हातात पेन, वह्या आणि लॅपटॉप आहेत. सुरक्षा जवानांवर दगडफेक करणारे जम्मू आणि काश्मीरचे लोक आता हातात पुस्तके आणि पेन घेऊन रस्त्यावर फिरतात,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा