आगामी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यासाठी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र त्यांच्या पुनरागमनाबाबत अद्यापही शंका आहे. अर्थात, तो पुढील महिन्यात आयर्लंडविरोधात होणाऱ्या टी २० मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. तो खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होत आहे. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. त्यामुळे तो संघात परतण्यासाठी एनसीएमध्ये अधिकाधिक सराव करत आहे. श्रेयस अय्यर यानेही फलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
मार्च महिन्यात बुमराहवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर थोडा आराम केल्यानंतर त्याने गेल्याच महिन्यात एनसीएमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. बीसीसीआयचे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या निरीक्षणाखाली त्याच्या संपूर्ण फिटनेसचे वेळापत्रक पार पाडले जात आहे. ते सर्व शक्तिनिशी नेटमध्ये सराव करत आहेत. त्यात ते आठ ते १० षटके टाकत आहेत.
हे ही वाचा:
राहुल गांधी म्हणजे निराश ‘राजपुत्र’
नशीब असावं तर असं! लॉटरी खरेदी केल्यावर तासाभरात क्लर्क झाला करोडपती
बांद्रा बँडस्टँड येथे भरतीच्या लाटेने नेले महिलेला ओढून
भारतात पोहोचताच पंतप्रधानांनी घेतला दिल्लीच्या पूरस्थितीचा आढावा
निवड समिती आशियाडमधील क्रिकेट स्पर्धेसाठी बुमराह याची निवड करण्याच्या विचारात आहे. गेल्या काही आठवड्यांपासून त्याने दाखवलेल्या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर तो पुढील महिन्यात या स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या दुय्यम दर्जाच्या संघासोबत जाऊ शकेल. याचा निर्णय आगामी काही दिवसांत घेतला जाईल. गेल्या सप्टेंबरपासून कोणताही सामना न खेळल्याने तसेच, त्याच्या शस्त्रक्रियेचे स्वरूप पाहता त्याच्यावर अधिक लक्ष दिले जात आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तो नेट्समध्ये विनाअडथळा गोलंदाजी करत आहे. एनसीएमध्ये तो काही सराव सामनेही खेळू शकतो.







