33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषप्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

Google News Follow

Related

कारुळकर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे प्रमुख उद्योगपती प्रशांत कारुळकर यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आपल्या कुटुंबाकडून समाजसेवेचा वारसा मिळालेले उद्योगपती प्रशांत कारूळकर यांनी कोरोना महमारीच्या काळात भिन्नभिन्न प्रकारे समाजाला मदतीचा हात दिला. त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यात आला आहे. शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे हा सन्मान सोहळा पार पडला.

गेले दीड वर्षा पेक्षा अधिक काळ जगावर कोरोना नावाचे संकट घोंगावत आहे. या संकटात समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले अशा संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपल्या समाज बांधवांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. यात अनेक व्यक्ती, संस्था, संघटना सर्वांचा समावेश होता. उद्योगपती प्रशांत कारुळकर आणि कारुळकर प्रतिष्ठान हे त्यातलेच एक घटक!

संकटाच्या वेळी प्रशांत कारुळकर यांनी अन्न, औषध, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन बेड इत्यादी देऊन अनेक गरजू लोकांना दिलासा दिला होता. या कठीण परिस्थितीत गरजूंना आधार देऊन त्यांनी अनुकरणीय काम केले. यामुळे समाजात एक चांगला संदेश गेला. कोरोनाच्या काळात आपले काम सोडून नेहमी इतरांना मदत करून त्यांनी आदर्श निर्माण केला. प्रशांत कारुळकर यांना ३ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा एकदा मुंबईत कोविड योद्धा २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा:

शिवसेना आमदाराच्या उपस्थितीत ‘जुलूस जबरदस्ती’

कृष्णा नागरची ‘शटल’ एक्स्प्रेस; जिंकले सुवर्ण

पंतप्रधान मोदी जगात भारी!

रोहितच्या ऐतिहासिक शतकामुळे भारत मजबूत स्थितीत

‘आझादी का अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. कोविड योद्धा 2021 चा पुरस्कार कारुळकर प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत कारुळकर यांना देण्यात आला, ही संस्था नेहमीच सामाजिक उपक्रम आणि मुंबईच्या जनतेच्या हितासाठी काम करते. कोरोना काळात प्रदान केलेल्या चांगल्या सेवेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुंबईचे माजी शेरीफ जगन्नाथन हेगडे, नादेंद्र वाबळे, महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष कृपाशंकर यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा