24 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषमंत्रिमंडळ निर्णय; सरपंच- उपसरपंचांचे मानधन दुप्पट, ब्राह्मणांसाठी महामंडळ

मंत्रिमंडळ निर्णय; सरपंच- उपसरपंचांचे मानधन दुप्पट, ब्राह्मणांसाठी महामंडळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली बैठक

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून आचारसंहिताही लागू शकते. अशातच होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे. या बैठकीत ग्रामविकास विभागांतंर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे. सरपंच- उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय-

  • 1. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे करण्याचा निर्णय (सामान्य प्रशासन)
  • 2. बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना; शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी (महिला व बाल विकास)
  • 3. धान उत्पादकांना दिलासा; प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर (अन्न नागरी पुरवठा)
  • 4. कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश (इतर मागास बहुजन कल्याण)
  • 5. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय)
  • 6. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग; १,४८६ कोटीचा प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम)
  • 7. करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा (वित्त)
  • 8. यवतमाळ, जळगाव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते (वस्त्रोद्योग)
  • 9. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतील भूखंड (महसूल)
  • 10. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास)
  • 11. राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ (ग्रामविकास)
  • 12. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम)
  • 13. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार (ऊर्जा)
  • 14. एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार; साठ वर्षाचा भाडेपट्टा करार (परिवहन)
  • 15. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ (नियोजन)
  • 16. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ (नियोजन)
  • 17. राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण (कौशल्य विकास)
  • 18. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये (उच्च व तंत्रशिक्षण)
  • 19. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा (क्रीडा)
  • 20. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी (जलसंपदा)
  • 21. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार (महसूल)
  • 22. दूध अनुदान योजना सुरु राहणार; उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान (दुग्ध व्यवसाय विकास)
  • 23. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर (सांस्कृतिक कार्य विभाग)

हे ही वाचा : 

आतिशी यांनी रिकामी ठेवली केजरीवालांची खुर्ची, भाजपाकडून टोमणा!

ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

वर्षा गायकवाड, उद्धव ठाकरेंच्या कारस्थानामुळे धारावीत जमाव उतरला!

श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध’

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा