28.6 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषभारतीय संघ जिंकणार टी-२० मालिका?

भारतीय संघ जिंकणार टी-२० मालिका?

Google News Follow

आज भारत विरुद्ध वेस्टइंडीज टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना जिंकून मालिकेवर शिक्का मारण्याची भारताला एक चांगली संधी असणार आहे. पहिल्या सामन्यात ६ विकेट्सने विजय संपादन करत भारताने मालिकेत १-० आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून मालिका विजयाची संधी भारताला चालून आली आहे.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत ३-० असा पराभव पत्करल्यानंतर वेस्ट इंडीज संघ टी-२० मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण पहिला सामना भारतीय संघाने जिंकल्यामुळे वेस्ट इंडिजचा हा प्रवास खडतर झाला आहे. पण उर्वरित दोन सामने जिंकून २-१ अशी मालिका जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ प्रयत्न करताना दिसले. त्या दृष्टीने आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. आजचा सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ मैदानात उतरले.

हे ही वाचा:

किरीट सोमैय्या कोर्लाई गावाकडे रवाना

शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल अब्दुल सत्तार यांची चौकशी

३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’

‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’

भारतीय संघासाठी आजचा सामना जिंकत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेण्याची नामी संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया या संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी खेळताना दिसेल. भारतीय संघ पहिल्या सामन्यातील खेळाडूंना पुन्हा संघात स्थान देणार की नव्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा