22 C
Mumbai
Saturday, January 24, 2026
घरविशेषराजधानी दिल्ली स्फोटाने हादरली ; आठ नागरिकांच्या मृत्यूची माहिती

राजधानी दिल्ली स्फोटाने हादरली ; आठ नागरिकांच्या मृत्यूची माहिती

लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये स्फोट, दिल्ली मुंबईसह प्रमुख शहरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

Google News Follow

Related

देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या स्फोटात सुमारे आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. १२ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीच्या घटनेनंतर मुंबईत सुद्धा सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या स्फोटानंतर परिसरातील तीन ते चार वाहनांनी पेट घेतला. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी जखमींची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला तसेच पोलिसांकडून या घटनेची सविस्तर माहिती दिली.

अमित शहा हे उद्या बैठक घेणार असून त्यात विविध मुद्द्यांची चर्चा होणार आहे. या स्फोटात वापरली गेलेली कार नेमकी कुठली याची माहिती घेतली जात आहे.  आय २० कार असून तिची नोंदणी हरयाणाची असंल्याचे सांगितले जात आहे.

 

स्फोट झालेल्या वाहनाच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या. अनेक वाहनाचे पार्ट परिसरात जळून पडले होते. जखमींना जवळच्या एलएनजीपी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

स्फोटाचा आवाज इतका मोठा की परिसरातल्या नागरिकांना काहीही समजले नाही. परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ हा स्फोट झाला. माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभी असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाल्याची सूचना त्यांना मिळाली. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

हेही वाचा..

चतुरंग दंडासनाची योग्य पद्धत जाणून घ्या

“आयपीएस बनायचं होतं संजू सॅमसनला; पण वडिलांनी नोकरी सोडून केला क्रिकेटर!”

भारतीय महिला क्रिकेट संघाला मिळू शकतो परदेशी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच

“हातांनी अनुभवला जंजिरा… किल्ल्यानेही जाणवला तो स्पर्श!”

स्फोटानंतर कारजवळ उभ्या असलेल्या इतर तीन वाहनांनाही आग लागल्याचे सांगितले जात आहे. विभागाने सांगितले की, घटनेची कॉल मिळताच टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर पोलिसांनी बंदोबस्तात घेतला आहे, तसेच सामान्य वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

प्राथमिक तपासात दिल्ली पोलिसांनी सांगितले की पार्क केलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या सुमारे १५ अग्निशमन दलाच्या गाड्या स्फोटाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की लाल किल्ला परिसर दिल्लीतील सर्वाधिक गर्दीचे आणि व्यापारी क्षेत्रांपैकी एक आहे. संध्याकाळच्या वेळी येथे मोठी गर्दी, बाजारपेठा आणि पर्यटकांची वर्दळ असते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा