23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेष...आणि बघता बघता पार्किंगमधली कार बुडाली

…आणि बघता बघता पार्किंगमधली कार बुडाली

Google News Follow

Related

घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला दुकानाच्या मागे रामनिवास या जुन्या सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार अचानक पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना रविवार १३ जून २०२१ रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.

या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाय योजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी / कर्मचारी देखील सदर घटनास्थळी हजर आहेत.

पालिकेने मात्र कारच्या या घटनेशी महापालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही, असे म्हणत हात झटकले आहेत. ही घाटकोपर भागातील खासगी सोसायटीतील घटना आहे. आता ही विहीर कधीची आहे, त्यावर असे तकलादू बांधकाम करणे योग्य आहे का, गाडीत कुणी असते तर त्याच्या मृत्यूला कोण जबाबदार ठरले असते किंवा आणखी एखादी मोठी हानी झाली असती तर त्याची जबाबदारी कुणाची असती, असे अनेक प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा