28.1 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरविशेषचमोलीतील बोगदा दुर्घटनेत मृतांचा आकडा ८ वर

चमोलीतील बोगदा दुर्घटनेत मृतांचा आकडा ८ वर

बेपत्ता कामगारांसाठी बचावकार्य युद्धपातळीवर

Google News Follow

Related

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पिपलकोटी येथे निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात पाणी आणि मलबा अचानक घुसल्याने झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठवर पोहोचला आहे. शनिवारी बचाव पथकांना आणखी एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, बोगद्यात अडकलेल्या उर्वरित कामगारांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास टेकरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ४४४ मेगावॅट क्षमतेच्या विष्णुगाड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या निर्माणाधीन बोगद्यात घडली. अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आणि मलबा बोगद्यात शिरल्याने आत काम करणाऱ्या २२ कामगारांवर संकट कोसळले. यापैकी अनेकांना तातडीने बाहेर काढण्यात आले; मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा:
अदानींचा ऊर्जा क्षेत्रात मोठा विस्तार; ₹८,५०० कोटींच्या प्रकल्पावर झेप

टीव्हीवरील जाहिरातींच्या मर्यादेला अखेर ब्रेक

ब्लिंकिट, झेप्टो , इन्स्टामार्टच्या केंद्रांवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

राहुल गांधी, खर्गे यांची पुन्हा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाला दांडी

बोगद्यात पाणी साचल्याने आणि मलब्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, आयटीबीपी, सीआयएसएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस यांची पथके अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने शोधमोहीम राबवत आहेत. काही भागात पाण्याची पातळी मोठी असल्याने पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे कामही सुरू आहे. सततचा पाण्याचा प्रवाह, कमी दृश्यमानता आणि बोगदा आणखी खचण्याचा धोका यामुळे बचाव पथकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे पाण्याने संतृप्त झालेला भूगर्भातील जलसाठा फुटल्याने बोगद्याच्या छताच्या भागातून अचानक पाणी आणि मलबा आत घुसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र दुर्घटनेचे नेमके कारण आणि सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटींची सविस्तर चौकशी होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना टेकरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमी कामगारांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, बेपत्ता कामगारांचा शोध आणि बोगद्यातील पाणी-मलबा हटवण्याचे काम सुरूच असून, बचाव पथकांचे संपूर्ण लक्ष अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यावर केंद्रित आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा