राज्यात गडकिल्ल्यांच्या नावाने, देवी– देवतांच्या नावाने, महापुरुषांच्या नावाने अनेक बिअर बार, डान्स बार सुरू असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. बीडमधील तरुणांनी याला विरोध करत ही नावे बदलण्याची आणि भविष्यात अशा नावांना परवानगी न देण्याची मागणी केली आहे. यासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे.
बीडमधील शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. २५ सप्टेंबर २०२५ (गुरुवार) रोजी बीडच्या कलेक्टर ऑफिसजवळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण केले जाणार आहे. शिवभक्त संग्राम उर्फ अक्षय ढोलेपाटील यांनी यासंबंधीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
”पंतप्रधान मोदींचं मोठं मन”, काँग्रेस खासदाराने का केलं कौतुक?
संपूर्ण स्वराज्याचे रक्षण ज्या गडकिल्ल्यांमुळे झालं त्याचं गडकिल्ल्यांच्या नावाने, हिंदू देव–देवता यांच्या नावाने राज्यामध्ये बिअर बार, परमिट रूम, बिअर शॉपी, डान्सबार सुरु आहेत. यामुळे अपमान होत असून महाराष्ट्र सरकारने त्या नावांमध्ये बदल करावा, अशी मागणी केली जात आहे.. याशिवाय पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे नाव बिअर बार, परमिट रूम आणि बियर शॉपी, डान्सबार यांना देता येणार नाही यासाठी लवकरात लवकर कायदा करावा, अशीही मागणी केली जात आहे. या मागणीसाठी लक्षणीय उपोषण सुरू केले जाणार आहे. तर, मागणी मान्य झाली नाही तर महाराष्ट्रभर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी विनंती शिवभक्तांनी केली आहे.







