उत्तर-पूर्व दिल्लीतल्या सीलमपूर परिसरात झालेल्या चर्चित हत्या प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत लेडी डॉन जिकरा यांच्यासह ८ आरोपींविरुद्ध कडकडडूमा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात हत्या, गुन्हेगारी कट रचणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात जिकरा व्यतिरिक्त जाहिदा, शाहिद, अनस, अनीस, नफीस आणि विकास यांची नावे आहेत. या सर्वांना १७ वर्षीय कुणालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. ही घटना सीलमपूरच्या जे-ब्लॉकमध्ये घडली होती, जिथे कुणालला चाकूने भोसकून ठार मारण्यात आले होते. कुणाल याच परिसरातील रहिवासी होता.
दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०३ (१), ६१ (२), ३५१ (३), ३ (५), २४९ (अ) आणि २३८ (अ) अंतर्गत आरोप दाखल केले आहेत. ही सर्व कलमे हत्या, कटकारस्थान, हल्ला, संघटित गुन्हेगारी आणि गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. सीलमपूरच्या जे-ब्लॉकमध्ये १७ वर्षांच्या कुणालच्या निर्घृण हत्येमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप उसळला होता. आरोप आहे की, काही तरुणांनी त्याला घेरून चाकूने हल्ला केला, ज्यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली होती.
हेही वाचा..
शेख शाहजहानविरुद्ध सीबीआय चौकशीचा आदेश कायम
मालेगाव स्फोटावर चित्रपट तयार करण्याचा निर्मात्यांना अधिकार
मंदिरात महात्मा बनून राहात होता इमामुद्दीन, उ. प्र. पोलिसांकडून अटक
सुप्रीम कोर्टने राहुल गांधींना फाकारले !
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल आपल्या आजीला रुग्णालयातून डिस्चार्ज करून घरी परतला होता. तो दूध व जेवण घेण्यासाठी घराबाहेर गेला असताना, काही मिनिटांत शेजारच्या मुलांनी सांगितले की त्याच्यावर काही मुलांनी आणि एका मुलीने चाकूने हल्ला केला आहे. तोपर्यंत घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली, पण कुणाल रक्ताच्या थारोळ्यात सापडला आणि रुग्णालयात नेल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. आता या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, सर्वांच्या नजरा ८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीवर खिळल्या आहेत.







