भारतीय कसोटी संघाचा खंबीर आधारस्तंभ ठरलेला चेतेश्वर पुजारा याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांतून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुजाराने रविवारी सोशल मीडियावरून एक भावनिक पोस्ट करत हा निर्णय जाहीर केला.
पुजारा म्हणाला –
“भारतीय जर्सी अंगावर चढवणं, राष्ट्रगीत म्हणणं, आणि मैदानावर प्रत्येकवेळी देशासाठी जीव ओतून खेळणं – या क्षणांचं खरं मूल्य शब्दांत मांडता येणं अशक्य आहे. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतोच. मनात अपार कृतज्ञता ठेवून मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.”
त्याने बीसीसीआय, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, देश-विदेशातील सर्व संघ-फ्रँचायझी, प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे विशेष आभार मानले. तसेच आपल्या आई-वडील, पत्नी आणि मुलीचेही या प्रवासात दिलेल्या आधाराबद्दल ऋण व्यक्त केले.
📌 करिअरची झलक
-
आंतरराष्ट्रीय पदार्पण : २०१०
-
शेवटची कसोटी : जून २०२३
-
कसोटी : १०३ सामने | ७,१९५ धावा | ४३.६० सरासरी
-
शतके : १९ (यात ३ दुहेरी शतकांचा समावेश)
-
अर्धशतके : ३५
-
सर्वोच्च धावसंख्या : २०६
-
एकदिवसीय सामने : ५
हेही वाचा :
ग्रेटर नोएडामधील हुंडाबळीप्रकरणातील आरोपी नवऱ्याला चकमकीत लागली गोळी
सीएम भगवंत मान यांच्या घराबाहेर का झाले आंदोलन ?
गांधी काहीही बोलले, देशाने सहन केले असे होणार नाही
कोकणसाठी ‘मोदी एक्सप्रेस’ चालवणे ही जनसेवेची भावना
गेल्या दशकभरात भारताने कसोटीत परदेशात मिळवलेल्या अविस्मरणीय विजयांत पुजाराची धीरगंभीर फलंदाजी मणक्याचा कणा ठरली होती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या कठीण भूमीवर त्याने उभारलेल्या इनिंग्ज आजही प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनात कोरलेल्या आहेत.
मैदानावरून उतरलेला पुजारा आता समालोचनातून क्रिकेटविश्वात आपलं योगदान देत राहील.







