पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव्ह सेइशी हिरोसे यांची भेट घेतली. यादरम्यान पुजारी रेव्ह सेइशी हिरोसे यांनी पंतप्रधान मोदींना ‘दारुमा बाहुली’ भेट दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट स्वरूपात मिळालेल्या दारुमा बाहुलीची सर्वत्र चर्चा होत आहे.
खरे तर, दारुमा बाहुली ही जपानची एक विशेष सांस्कृतिक प्रतीक आणि स्मृतिचिन्ह आहे, जी बौद्ध धर्माच्या जैन पंथाचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) वर आधारित आहे. ही बाहुली चिकाटी आणि शुभेच्छा यांचे प्रतीक मानली जाते. ध्येय निश्चित करण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी तिचा वापर केला जातो.
जेव्हा ध्येय निश्चित केले जाते, तेव्हा बाहुलीचा एक डोळा रंगाने भरला जातो आणि जेव्हा ध्येय साध्य होते, तेव्हा दुसरा डोळा रंगाने भरला जातो. ती ‘सात वेळा पडा, आठ वेळा उठा’ या म्हणीचे देखील प्रतिबिंबित करते, जे कधीही हार न मानण्याचा गुण आहे. या बाहुलीचा खालचा भाग गोल असल्याकारणाने ती खाली पडली कि पुन्हा उभी राहते.
‘दारुमा’ बाहुली भारतातील कांचीपुरम येथून आलेल्या बौद्ध भिक्षू बोधिधर्मावर आधारित आहे. असे मानले जाते की बोधिधर्माने सतत ९ वर्षे भिंतीकडे तोंड करून, हातपाय दुमडून ध्यान केले. दारुमा बाहुलीचा आकार गोल आणि हात, पाय आणि डोळे नसलेले असण्याचे हेच कारण आहे. जपानमध्ये नवीन वर्षाच्या आसपास सामान्यतः पाहिल्या जाणाऱ्या दारुमा बाहुल्या मंदिरे आणि उत्सवांमध्ये यश, व्यवसाय समृद्धी, परीक्षा आणि वैयक्तिक वाढीसाठी आकर्षण म्हणून विकल्या जातात.
हे ही वाचा :
“थोडीशी लाज शिल्लक असेल तर राहुल गांधींनी माफी मागावी”
“पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भारताला भोगावी लागत आहे”
“मी टोकियोची चायवाली तुम्ही भारताचे चायवाले”
ममता बॅनर्जीं भाषावाद करतायेत, मतदार यादीत रोहिंग्या, घुसखोर अन मृतांची नावे!
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी व्यावसायिक जगतातील दिग्गजांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जपानच्या प्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष नुकागा फुकुशिरो आणि जपानी खासदारांच्या गटाशी बैठक घेतली. या दरम्यान भारत आणि जपानमधील मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा झाली.
टोकियोला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांशी भेटतील आणि दोन्ही देशांमधील गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा केली जाईल. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये नवी ऊर्जा येईल अशी अपेक्षा आहे.
#WATCH | Tokyo | Chief Priest of Shorinzan Daruma-Ji Temple presents Daruma Doll to PM Modi
(Video source: ANI/DD) pic.twitter.com/m4alaRQBMZ
— ANI (@ANI) August 29, 2025







