27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरविशेषचीनचा तैवानवर क्षेपणास्त्र हल्ला?, तैवान परराष्ट्र मंत्र्यांची पळापळ!

चीनचा तैवानवर क्षेपणास्त्र हल्ला?, तैवान परराष्ट्र मंत्र्यांची पळापळ!

तैवानमध्ये भीतीचे वातावरण

Google News Follow

Related

तैवानमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी मंगळवारी एक खळबळजनक घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले.तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांची तैपेईमध्ये पत्रकार परिषद सुरु होती.दरम्यान, त्यांच्या मोबाईलवर एक इशाऱ्याचा अलर्ट मेसेज आला.या मेसेजमध्ये म्हटले होते की, चिनी क्षेपणास्त्रे तैवानमध्ये घुसली आहेत.हा इशाऱ्याचा संदेश मंत्री जोसेफ वू यांच्याच नाहीतर देशातील अनेकांच्या फोनवर आला.या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली.परराष्ट्रमंत्री देखील हा संदेश पाहून बिथरले.या गोंधळा दरम्यान तैवान संरक्षण मंत्रालयाने देशात अलर्ट जारी केला की, चीनने हवाई हल्ला केला आहे.

मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:०५ वाजता( भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.३५) वाजता चीनची क्षेपणास्त्रे तैवानमध्ये घुसत आहेत असा संदेश संपूर्ण तैवानमध्ये आला.विशेष म्हणजे, त्याचवेळी तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांची आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात तैपेईमध्ये परदेशी पत्रकारांसोबत पत्रकार परिषद चालू होती.असाच एक मेसेज त्यांच्याफोनवर देखील आला.संरक्षण मंत्रालयानेही लगेच प्रतिक्रिया दिली आणि देशभरात अलर्ट जारी केला.चीन आपल्यावर हल्ला करेल अशी भीती लोकांना वाटू लागली.मात्र, हे चुकीचे असल्याचे नंतर त्याच्या लक्षात आले.

हे ही वाचा:

मालदीववरून शरद पवार मोदींच्या पाठीशी!

लक्षद्वीपच्या मिनिकॉय बेटावर नवं विमानतळ बांधणार; नागरी, लष्करी विमाने उतरवता येणार

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डीला खेलरत्न तर शमीला अर्जुन!

लाइटहाऊस’ प्रकल्प करेल दीपस्तंभाप्रमाणे काम

घडले असे की, चीनने आइनस्टाईन प्रोब उपग्रह प्रक्षेपित केला.परंतु मोबाईलवर आलेल्या मेसेजमध्ये मिसाईल हा शब्द इंग्रजीत लिहिला होता, तर तोच शब्द मैंडेरीन भाषेत सॅटेलाईट असा आहे.संरक्षण मंत्रालयाने नंतर माफी मागितली आणि सांगितले की, चीनने उपग्रह प्रक्षेपण करताना इंग्रजी भाषेचा वापर केल्याने हा गोंधळ झाला.

जोसेफ वू यांनी नंतर स्पष्ट केले की, जेव्हा एखादे रॉकेट आकाशात उड्डाण घेते तेव्हा त्याचा ढिगारा(मलबा) आपल्या भूभागावर पडतो.त्यामुळे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने हा हवाई हल्ला मानला.यापूर्वीही असेच घडले आहे, ते पुढे म्हणाले.ते पुढे म्हणाले, चीनने उपग्रह प्रक्षेपण केले आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा