तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, चीनच्या १७ लष्करी विमानं आणि ७ नौदल जहाजांची हालचाल तैवानच्या सीमेजवळ आढळली आहे. ही हालचाल शनिवारी सकाळी ६ वाजेपर्यंत (स्थानिक वेळेनुसार) नोंदवण्यात आली. मंत्रालयाच्या माहितीनुसार, १७ पैकी ८ चीनी लष्करी विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा ओलांडली आणि दक्षिण-पश्चिम वायुसुरक्षा ओळख क्षेत्रात (ADIZ) प्रवेश केला. चीनच्या या हालचालींच्या प्रत्युत्तरात तैवानच्या सशस्त्र दलांनी सतर्कतेने परिस्थितीवर लक्ष ठेवत आपली लढाऊ विमाने, नौदल जहाजं आणि किनारपट्टी सुरक्षा प्रणाली सक्रिय केल्या.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी करून सांगितले, “आज सकाळी ६ वाजेपर्यंत तैवानच्या आजूबाजूला पीएलए (चिनी सेना) ची १७ लष्करी विमानं आणि पीएलए नौदलाची ७ जहाजं दिसली. यातील ८ विमानं मध्यरेषा ओलांडून दक्षिण-पश्चिम वायुसुरक्षा क्षेत्रात गेली. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक त्या कारवाया केल्या. ही घटना शुक्रवारी झालेल्या अशाच प्रकारच्या घुसखोरीनंतर समोर आली आहे. शुक्रवारी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते की सकाळी ६ वाजेपर्यंत चीनची २६ लष्करी विमानं, ७ नौदल जहाजं आणि १ सरकारी जहाज तैवानच्या सीमेजवळ दिसली होती. त्यातील २४ विमानांनी मध्यरेषा ओलांडून तैवानच्या उत्तर आणि दक्षिण-पश्चिम वायुसुरक्षा क्षेत्रात प्रवेश केला होता.
हेही वाचा..
कंबोडियाच्या भारतीय दूतावासाने काय दिलाय सल्ला ?
भूस्खलन आणि पुरामुळे केदारनाथ यात्रा थांबली!
काँग्रेस देशाचाच विरोध करू लागलीय
मालेगाव स्फोट प्रकरण : ३१ जुलै रोजी एनआयए न्यायालय निर्णय सुनावण्याची शक्यता
त्यावेळीही तैवानच्या लष्कराने परिस्थितीवर नजर ठेवत योग्य तो प्रतिसाद दिला. मंत्रालयाने ‘एक्स’वर म्हटले होते, “आज सकाळी ६ वाजेपर्यंत तैवानभोवती पीएलएची २६ लष्करी विमानं, ७ नौदल पोत आणि १ सरकारी जहाज दिसले. यातील २४ विमानं मध्यरेषा ओलांडून तैवानच्या उत्तर व दक्षिण-पश्चिम ADIZ मध्ये घुसली होती. आम्ही सतर्कतेने लक्ष ठेवत प्रतिसाद दिला. याचा संदर्भ घेतल्यास, तैवान १९४९ पासून स्वतंत्ररित्या शासित आहे, पण चीन ‘वन चायना पॉलिसी’ अंतर्गत तैवानला स्वतःचाच भाग मानतो आणि बीजिंगसह पुन्हा एकत्र येण्याची मागणी करत असतो. सततच्या चिनी लष्करी दबावामध्ये तैवानचे लष्कर पूर्णपणे अलर्टवर असून द्वीपाच्या सार्वभौमत्वाची रक्षा आणि प्रादेशिक स्थैर्य टिकवण्यासाठी सतत गस्त आणि प्रत्युत्तरात्मक हालचाली करत आहे.







