31 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरविशेषएआय समिटमध्ये चीनी रोबोडॉग स्वतःच विकसित केल्याचा दावा

एआय समिटमध्ये चीनी रोबोडॉग स्वतःच विकसित केल्याचा दावा

सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात

Google News Follow

Related

ग्रेटर नोएडा येथील गलगोटियास विद्यापीठाने दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान प्रदर्शित केलेल्या एका चीनी रोबोटिक डॉगमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. संबंधित चीनी रोबोटिक डॉग हा स्वतः विकसित उत्पादन म्हणून सादर केल्याच्या आरोपांमुळे सोशल मीडियावर विद्यापीठाला टीकेला सामोरे जावे लागले. वाद वाढल्यानंतर विद्यापीठाने अधिकृत निवेदन जारी करून स्पष्ट केले की, ही तंत्रज्ञान निर्मिती आपण केल्याचा कधीही दावा करण्यात आलेला नाही. दरम्यान, वादानंतर इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून ताबडतोब माघार घेण्याच्या सूचना विद्यापीठाला देण्यात आल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. मात्र, आपल्याला सरकारकडून असा कोणताही आदेश मिळालेला नाही असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये समिटदरम्यान एका महिलेने असे सांगितल्याचे दिसते की, गलगोटियासच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने “ORIAN” नावाचा रोबोडॉग विकसित केला आहे. व्हिडिओमध्ये रोबोटची वैशिष्ट्ये सांगताना त्याला विद्यापीठाची उपलब्धी म्हणून सादर करण्यात आल्याचे दिसते. त्यानंतर अनेक युजर्सनी आयात केलेल्या तंत्रज्ञानाला स्वदेशी नवकल्पना म्हणून दाखवल्याचा आरोप केला.

प्रत्यक्षात प्रदर्शित करण्यात आलेला रोबोडॉग हा चीनमधील रोबोटिक्स कंपनी Unitree Robotics निर्मित ‘Unitree Go2’ मॉडेल आहे. या रोबोटची ऑनलाइन किंमत सुमारे २ ते ३ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. विद्यापीठाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, हा रोबोडॉग युनिट्रीकडून खरेदी करण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात्मक साधन म्हणून वापरला जात आहे.

प्रसिद्ध केलेल्या निवेदनात विद्यापीठाने म्हटले, “युनिट्रीकडून नुकताच मिळालेला हा रोबोडॉग आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ही केवळ प्रदर्शनासाठी ठेवलेली मशीन नसून चालती- बोलती वर्गखोली आहे. आमचे विद्यार्थी त्यावर प्रयोग करत आहेत, त्याच्या मर्यादा तपासत आहेत आणि या प्रक्रियेत स्वतःचे ज्ञान वाढवत आहेत. स्पष्ट सांगतो: गलगोटियासने हा रोबोडॉग तयार केलेला नाही आणि आम्ही असा दावा कधीही केलेला नाही.”

हे ही वाचा:

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा; मविआचा एक तरी खासदार निवडून येईल?

एआय समिटमधून चोरीला गेलेले स्टार्टअप डिव्हाइस २४ तासांत सापडले

पाकिस्तानसाठी रावी नदीचे पाणी बंद!

अल्फाबेटपासून मायक्रोसॉफ्ट, चॅनेल, अ‍ॅडोबचे सीईओ भारतीय!

मात्र, विद्यापीठाच्या या स्पष्टीकरणावर एक्सवरील एका कम्युनिटी नोटद्वारे फॅक्ट-चेक करण्यात आले. त्या नोटमध्ये संस्थेचे विधान दिशाभूल करणारे असल्याचा दावा करण्यात आला. “रोबोटला ‘ओरियन’ असे नाव देण्यात आले असून, तो त्यांच्या टीमने विकसित केल्याचा स्पष्ट दावा करण्यात आला आहे,” असे त्यात नमूद केले आहे. स्पष्टीकरण देताना विद्यापीठाने म्हटले की, नवोन्मेष आणि शिक्षणाला सीमा नसते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी जगभरातील उत्कृष्ट तंत्रज्ञान आणण्याची आपली भूमिका कायम राहील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांना परिचित करून देणे, त्यांना ते समजून घेण्यास, प्रश्न विचारण्यास आणि पुढे अधिक चांगले विकसित करण्यास प्रवृत्त करणे हा संस्थेचा उद्देश असल्याचेही नमूद करण्यात आले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा