34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरविशेषभारताच्या आक्षेपानंतर बांगलादेशात चिनी कारवायांना चाप

भारताच्या आक्षेपानंतर बांगलादेशात चिनी कारवायांना चाप

ढाक्यातील वस्त्यांचे व्हिडीओ दाखवून केली दिल्लीची बदनामी

Google News Follow

भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी बांगलादेशच्या भूमीचा गैरवापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बांगलादेशातील ढाका येथे राहून काही चिनी नागरिक तिथल्या गरीब वस्त्यांचे व्हिडीओ शूट करत होते आणि ते भाग भारतातील (नवी दिल्लीतील) असल्याचे भासवून सोशल मीडियावर थेट प्रक्षेपित करत होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारताकडून आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर, आता बांगलादेशी सुरक्षा यंत्रणांनी या चिनी नागरिकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे.

बांगलादेशातील ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्राने गुरुवारी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले. उत्तरा पश्चिम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोहम्मद खालिद मन्सूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी संबंधित चिनी नागरिकांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात आहे.

हे ही वाचा:

यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती

मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? आठ वर्षांतील नीचांकी साठा

बदरकूटच्या जंगलातून दोन हँड ग्रेनेड जप्त

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

बांगलादेशी माध्यमांच्या वृत्तानुसार, सुमारे १५० चिनी नागरिक ढाक्यातील टेकपारा आणि उत्तरा या भागांत सक्रिय होते. या नागरिकांकडून तेथील अरुंद गल्ल्या आणि गरीब वस्त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण केले जात होते. विशेष म्हणजे, हे भाग भारतातील नवी दिल्लीतील असल्याचे भासवून तेथील रहिवाशांच्या राहणीमानाबाबत अपमानास्पद टिप्पणी केली जात होती. या व्लॉगर्सकडून स्थानिक नागरिकांची घरे आणि दैनंदिन जीवनाचे चित्रीकरण केले जात होते. काही वेळा रहिवाशांच्या परवानगीशिवाय त्यांच्या घरांमध्ये प्रवेश करूनही व्हिडीओ बनवले जात असल्याचे समोर आले आहे. या व्हिडीओंचा वापर नेमका कशासाठी केला जात आहे, याची माहिती स्थानिक नागरिकांना नसल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा