35 C
Mumbai
Wednesday, November 11, 2026
घरविशेषचंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नागरिक सरसावले; अडीच टन कचरा जमा

चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नागरिक सरसावले; अडीच टन कचरा जमा

श्रमदानातून चंद्रभागा स्वच्छतेचा संकल्प

Google News Follow

तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील चंद्रभागा नदीच्या वाळवंट परिसराचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी नगरपरिषद व होडी चालक-मालक संघाच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत तब्बल २.५ टन कचरा गोळा करण्यात आला. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी ही माहिती दिली. चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सर्वांनी श्रमदान करत परिसरातील प्लास्टिक, साचलेला कचरा आणि अन्य घनकचरा जमा केला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानात नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि इच्छुक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या अभियानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी.

हे ही वाचा:

वैदिक मंत्रोच्चारात केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद

लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावर हल्ला; एका भारतीय नागरिकासह चार खलाशी जखमी

त्रिपुरात निवडणुकीपूर्वीच भाजपचे ७७ उमेदवार बिनविरोध विजयी


कच्च्या तेलाच्या दरात २४ टक्क्यांची घसरण

पंढरपूर शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी व निर्मळ ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून ‘स्वच्छ पंढरपूर – सुंदर पंढरपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा