मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला. साधारणपणे याची भौतिक प्रगती ९४ टक्के झालेली आहे. रनवे पूर्णपणे सुसज्जित आहे. बाहेरील सिलिंगचे काम वेगाने करावे लागणार आहे, बाकी काम अत्यंत वेगाने चालले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
विमानतळावर बॅगेज हँडलिंगसाठी अतिशय कार्यक्षमता असणारी सिस्टीम उभी करण्यात आली आहे, ज्यामध्ये बॅगेचा बारकोड हा ३६० डिगरी त्याठिकाणी वाचता येवू शकतो आणि त्यातून ती योग्य ठिकाणी बॅगे पोहोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावरील बॅगेज हाताळणीची व्यवस्था, देशातील नव्हे तर जगातील वेगवान व्यवस्था असावी, असा आमचा प्रयत्न चाललेला आहे. विमानतळाचे पूर्ण काम होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेने याठिकाणी ९ कोटी प्रवाशांकरिता विमानतळ सुसज्ज होणार आहे. म्हणजे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापेक्षा बरेच मोठे विमानतळ होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या विमानतळामध्ये अनेक वैशिष्ठ आहेत, जसे कि हा ग्रीन विमानतळ आहे. यामध्ये ३७ मेगावॅट ग्रीन वीज वापरली जाणार आहे. येथील सर्व गाड्या इलेक्ट्रोनिक गाड्या किंवा अल्टरनेट इंधनाच्या राहणार आहेत. प्रवाशांच्या सुलभतेसाठी चारही दिशांनी मेट्रो, रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्टशी थेट संपर्क साधता येईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बॅगेज चेक-इन सुविधा शहरातच उपलब्ध असेल. “हा विमानतळ प्रवाशांसाठी एक आधुनिक, स्मार्ट आणि प्रगत दर्जाचा असेल. अंडरग्राऊंड मेट्रोमुळे कोणालाही पायी चालावे लागणार नाही, ही एक क्रांतिकारी सुविधा असेल,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
हे ही वाचा :
‘छांगुर बाबा’ असो वा नसो, धर्मांतराचे काम सुरूच राहिले पाहिजे…
मिलिंडाच्या घटस्फोटामागे कारण होते बिल गेट्सच्या जेफ्री एप्स्टीनशी झालेल्या भेटी!
मुस्लीम तरुणांकडून गोरक्षकाला मारहाण, व्हिडीओ बनवून केला शेअर!
वैमानिकांच्या संभाषणावरून घाईघाईने निष्कर्ष काढू नका!
विमानतळ पूर्ण कधी होणार?
पंतप्रधान मोदींची आम्हाला वेळ घ्यायची असल्याने अडाणी कंपनी, नवी मुंबई अथॉरिटी आणि सिडकोच्या लोकांना ३० सप्टेंबरपर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट त्यांना दिले आहे. १३ ते १४ हजार लोक याठिकाणी रोज काम करत आहेत, त्याची संख्या वाटली तर दीडपट-दुप्पट करा पण ३० सप्टेंबर पर्यंत काम करण्यास सांगितले आहे.
हे सर्व प्रकल्प महायुतीच्या काळातीलच आहेत. मध्यंतरी अडीच वर्ष या प्रकल्पांचा वेग कमी झाला होता. पुन्हा शिंदेच्या नेतृत्वात आमचे सरकार आले आणि पुन्हा वेग घेतला, आता ते पूर्ण आम्ही करत आहोत. पंतप्रधान मोदींनी याचे भूमिपूजन केले आणि तेच उद्घाटन देखील करणार आहेत, हे खूप महत्वाचे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
लंडन मधल्या हीथ्रो विमानतळाशी तुलना
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. ते म्हणाले, देशातील सर्वात मोठे विमानतळ याठिकाणी होत आहे. लंडन मधल्या ‘हीथ्रो विमानतळा’शी तुलना करणारे हे विमानतळ होत आहे. सर्व गोष्टींमुळे हे विमानतळ गेमचेंजर ठरेल. विकास हाच आपला अजेंडा असून विमानतळामुळे विकासात आणखी भर पडणार आहे.







