शशी थरूर यांच्या खंडनानंतर कोलंबियाने ‘ते’ विधान घेतले मागे!

थरूर यांनी ट्वीटकरत दिली माहिती 

शशी थरूर यांच्या खंडनानंतर कोलंबियाने ‘ते’ विधान घेतले मागे!

दहशतवादाविरुद्ध जागतिक पाठिंबा मिळविण्याच्या मोहिमेत भारताला मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. कोलंबिया सरकारने शुक्रवारी (३० मे) अधिकृतपणे एक निवेदन मागे घेतले, ज्यामध्ये त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या नागरिकांच्या मृत्युंबद्दल शोक व्यक्त केला होता.

खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील बहुपक्षीय शिष्टमंडळ कोलंबियाला पोहोचले आणि कोलंबिया सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी या विधानावर तीव्र निराशा व्यक्त केली. कोलंबियाच्या उपपरराष्ट्र मंत्री रोझा योलांडा विलाविचेंसिओ यांनी एएनआयला सांगितले की, “आज आम्हाला मिळालेल्या सविस्तर माहितीने आणि परिस्थितीच्या सत्यतेवर आम्ही समाधानी आहोत आणि या विषयावर संवाद सुरू ठेवू.” यावेळी त्यांच्यासोबत शशी थरूर देखील उपस्थित होते.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले, “उप परराष्ट्रमंत्र्यांनी आम्हाला अतिशय सौहार्दपूर्णपणे कळवले की त्यांनी ज्या विधानावर आम्ही चिंता व्यक्त केली होती ते विधान मागे घेतले आहे आणि आता कोलंबिया सरकारला आमचा दृष्टिकोन पूर्णपणे समजला आहे आणि हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”

थरूर यांनी त्यानंतर एक्सवर लिहिले, “आजची सुरुवात कोलंबियाच्या उपपरराष्ट्र मंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ आणि आशिया-पॅसिफिक प्रकरणांवरील त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांसोबतच्या एका उत्कृष्ट बैठकीने झाली. ८ मे रोजी कोलंबियाने केलेल्या विधानावर मी भारताची असहमती दर्शवली. मंत्र्यांनी आश्वासन दिले की हे विधान मागे घेण्यात आले आहे आणि भारताची भूमिका आता समजली आहे आणि त्याला पाठिंबा देण्यात आला आहे.”

हे ही वाचा :

मुंबईत समीर शेखने केले अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोग्याच्या वाटेवरची पहिली पायरी – वज्रासन

आयपीएलमध्ये साईने केली कमाल, धावामध्ये उडवली धमाल!

गुजरातची गाडी थांबली; मुंबई इंडियंसचा २० धावांनी विजय!

शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असलेले भाजप नेते तेजस्वी सूर्या यांनीही कोलंबियाने आपले पूर्वीचे विधान मागे घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “पर्यटकांना मारले जाणे आणि दहशतवाद्यांना निष्क्रिय केले जाणे यात फरक आहे. तुम्ही दोघांमध्ये समानता निर्माण करू शकत नाही. उपमंत्र्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी आमच्या युक्तिवादात तथ्य पाहिले आणि त्यांनी आधी केलेले विधान मागे घेतले. त्यांनी भारताच्या भूमिकेबद्दल पूर्ण सहानुभूती आणि समजूतदारपणा देखील व्यक्त केला,” असे त्यांनी एएनआयला सांगितले.

 

Exit mobile version