वज्रासन हे एक सोपं आणि प्रभावी योगासन आहे, तो कोणीही सहज करू शकतो. दिसायला अगदी साधं, पण फायदे मात्र खोल आणि आरोग्यदायी. रोज फक्त ५ ते १० मिनिटं वज्रासन केल्याने शरीराच्या अनेक तक्रारी दूर होतात. पचनसंस्था सुधारते, मानसिक तणाव कमी होतो आणि विशेषतः वजन घटवण्यास मदत होते.
वज्रासनाचे आरोग्यदायी फायदे:
👉 पचन सुधारते – जेवल्यानंतर वज्रासन केल्याने अन्न पटकन पचते
👉 वजन कमी होण्यास मदत – विशेषतः पोट आणि मांड्यांची चरबी घटते
👉 रक्तप्रवाह सुधारतो – साइटिका, गॅस, अपचन यांपासून आराम
👉 ब्लड प्रेशर नियंत्रणात – तणाव कमी होतो, मन शांत राहतं
👉 पाठदुखी आणि गुडघेदुखीपासून सुटका
👉 फुफ्फुसं बळकट होतात – श्वासोच्छ्वास सुधारतो
👉 लवचिकता वाढते – स्नायूंना आराम मिळतो
👉 मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त
कसं करायचं वज्रासन?
-
गुडघ्यांवर बसावं
-
पाठीला सरळ ठेवावं
-
पायाची बोटं जमिनीवर, टाचा वर
-
डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित करावं
-
ही मुद्रा ५-१० मिनिटं टिकवावी
टीप: जेवल्यानंतर ५ मिनिटं वज्रासन केल्यास पचन सुधारतं, अन्न हलकं वाटतं आणि शरीर आरोग्यदायी बनतं.
