32 C
Mumbai
Saturday, February 7, 2026
घरविशेषनेटफ्लिक्स, ए आर रहमानविरोधात संविधान सन्मान मंचची तक्रार

नेटफ्लिक्स, ए आर रहमानविरोधात संविधान सन्मान मंचची तक्रार

वांद्रे कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात तक्रार

Google News Follow

Related

संगीतकार ए आर रहमान यांनी केलेल्या भारतविरोधी विधानांच्या विरोधात संविधान सन्मान मंच या संस्थेने पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून तक्रार केली आहे. नेटफ्लिक्सने रहमान यांना त्यांच्या व्यासपीठावर (उदा. पॉडकास्ट किंवा चर्चासत्र) स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याबाबत संविधान सन्मान मंचचा तीव्र विरोध आहे,

त्या पत्रात म्हटले आहे की,  नेटफ्लिक्स इंडिया आणि ए. आर. रहमान यांच्याविरुद्ध आम्ही औपचारिक तक्रार नोंदवितो. नेटफ्लिक्सने रहमान यांना त्याच्या व्यासपीठावर (उदा. पॉडकास्ट किंवा चर्चासत्र) स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याबाबत आमचा तीव्र विरोध आहे. रहमान यांनी परदेशी माध्यमांमध्ये (जसे की ‘The Guardian’ आणि इतर) भारताला “गेल्या काही वर्षांपासून सांप्रदायिकदृष्ट्या अस्थिर” असे संबोधले आहे. तसेच, ‘छावा’ या चित्रपटाला जो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित असून सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे, अशा उत्कृष्ट आणि भावनिक चित्रपटाला “फूट पाडणारा” (Divisive) म्हटले आहे. ही विधाने देशाबाहेर जाऊन करणे अत्यंत गैरजबाबदार, राष्ट्रविरोधी आणि भारतीय समाजभावना दुखावणारे आहेत. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न निर्माण होत आहे आणि भारतीय न्याय संहिता कलम १९६ (समुदायांमध्ये वैमनस्य पसरवणे) अंतर्गत गुन्हा आहे.

हे ही वाचा: 

कार्ल्सबर्ग इंडियाचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये

एक अर्धवट देखणी, एक अर्धवट…

पीएम सूर्य घर योजनेचा २६ लाखांहून अधिक कुटुंबांना फायदा

एलन मस्क…एकदम मस्त, ८०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती

नेटफ्लिक्सचा हा निर्णय, कोणतीही दुरुस्ती किंवा संदर्भ न देता रहमान यांच्या चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या विधानांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करणारा आहे. यामुळे देशांतर्गत सामाजिक तणाव वाढू शकतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताबाबत चुकीचा संदेश जात आहे. नेटफ्लिक्स इंडिया च्या ‘सामाजिक जबाबदारी धोरणा’नुसार अशा प्रकारचे कार्यक्रम रोखणे राष्ट्रहितासाठी अति आवश्यक आहे, असेही त्यात म्हटले आहे.

संस्थेच्या मागण्या अशा-

१) नेटफ्लिक्सने तात्काळ खालीलपैकी एक उपाय योजावाः

अ. संबंधित भाग सर्व प्लॅटफॉर्मवरून (Netflix App, YouTube इ.) पूर्णतः हटवावा;

किंवा

ब. भाग सुरू ठेवायचा असल्यास ए. आर. रहमान यांच्याशी संबंधित सर्व अंश कायमस्वरूपी काढून टाकावेत;

किंवा

२. रहमान यांनी त्यांच्या विधानांबाबत औपचारिक, बिनशर्त सार्वजनिक माफी मागितल्यानंतरच तो भाग प्रसारित करावा.

2. आम्ही नेटफ्लिक्स इंडियाच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी बैठकाची मागणी करतो. कृपया बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनाखाली अशी बैठक आयोजित करावी ज्यात आमच्या तक्रारीवर समाधानकारक चर्चा होईल.

वरील मागण्या पूर्ण न झाल्यास, आम्हाला या दुष्कृत्याविरोधात जनआंदोलन उभे करावे लागेल तसेच संवैधानीक मार्गाने कायदेशीर लढा उभारला जाईल, असे संस्थेच्या वतीने ऍड.. उत्तम मल्लाह यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा