28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषखर्गे समस्याग्रस्त शेतकऱ्याला म्हणाले, प्रसिद्धीसाठी येऊ नका; भाजपकडून टीका

खर्गे समस्याग्रस्त शेतकऱ्याला म्हणाले, प्रसिद्धीसाठी येऊ नका; भाजपकडून टीका

भाजप नेते शहजाद पूनावाला यांचा खर्गे यांच्यावर हल्लाबोल

Google News Follow

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी जोरदार टीका केली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या व्यथा खर्गे यांच्यासमोर मांडल्या असता, त्यांनी त्या शेतकऱ्याला “पळून जा” असे उत्तर दिले, असा आरोप पूनावाला यांनी केला आहे. पूनावाला म्हणाले, “काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांचा, जवानांचा आणि भारतीय संविधानाचा अपमान करत आहे. काल एका शेतकऱ्याने काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्याशी आपल्या वेदना मांडल्या, आणि खर्गे यांनी त्याला ‘पळून जा’ असं म्हटलं. यावरून काँग्रेसचा शेतकऱ्यांबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.”

ते पुढे म्हणाले, “काँग्रेसने आठ वर्षे सत्तेत असताना स्वामिनाथन आयोगाचा अहवाल अंमलात आणला नाही. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे नाटक करत आहे.”

पूनावालांनी आणखी एक उदाहरण देत टीका करत सांगितले की, “पुरग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान काँग्रेस खासदार तारिक अन्वर यांना खांद्यावर उचलून नेण्यात आले. ही लोकशाहीची थट्टा आहे.” पूनावाला यांच्या मते, काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा आता जनतेसमोर उघड होत आहे. “ही पार्टी केवळ मतांसाठी शेतकरी आणि सामान्य जनतेच्या भावनांचा वापर करते, पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच करत नाही,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

हे ही वाचा : 

दहशतवादी कट रचल्याप्रकरणी एनआयकडून २२ ठिकाणी छापेमारी

जम्मूच्या आरएस पुरा सीमेवर पाकिस्तानी घुसखोराला बीएसएफकडून अटक!

हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात दगडफेक; सात जणांच्या आवळल्या मुसक्या

लाल किल्ला परिसरातील १ कोटींचा कलश चोरीप्रकरणी आरोपी अटकेत!

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रविवारी (७ सप्टेंबर) कर्नाटकातील कलबुर्गी येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत होते. या दरम्यान एका शेतकऱ्याने पिकांच्या नुकसानीचा, विशेषतः तूर डाळ आणि इतर पिकांच्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्या शेतकऱ्याने सांगितले की तो या समस्येवर बोलण्यासाठी आला आहे. यावर खरगे यांनी त्यांना अडवले आणि कडक स्वरात सांगितले की फक्त प्रसिद्धीसाठी येऊ नका.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा