25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरविशेषकाँग्रेस पक्ष म्हणजे बुडणारे जहाज!

काँग्रेस पक्ष म्हणजे बुडणारे जहाज!

काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीवर भाजप प्रवक्ते केशवन यांची टीका

Google News Follow

Related

बिहार विधानसभा निवडणुकीत आपला गमावलेला पाठिंबा परत मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष कोणतीही कसर सोडत नाहीये. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणी समितीची (CWC) पाटण्यात बैठक होत आहे. पाटण्यातील सदाकत आश्रमात ही बैठक सुरु असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे इतर नेते बैठकीला उपस्थित आहेत.

विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर प्रथमच, काँग्रेस पक्ष आज (बुधवार) पाटणा येथे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक घेत आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या या बैठकीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी.आर.केशवन यांनी टीका करत काँग्रेस पक्ष म्हणजे बुडणारे जहाज असल्याचे म्हटले.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सी.आर. केशवन यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना म्हटले की, “काँग्रेस पक्ष हे एक आशाहीन आणि बुडणारे जहाज आहे. आज ८५ वर्षांनंतर पाटणामध्ये झालेली काँग्रेस कार्यकारिणी (CWC) बैठक हा तिसऱ्या दर्जाचा प्रचाराचा प्रकार असून, हे बुडणाऱ्या जहाजावर चांदीची भांडी चकाकवण्यासारखे व्यर्थ आणि निरर्थक आहे.”

केशवन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच झालेल्या बिहार दौऱ्यावरही टीका केली. त्यांनी हा दौरा ‘महिला बदनाम यात्रा’ असे संबोधले आणि सांगितले की, “बिहारची नारी शक्ती राहुल गांधींच्या या यात्रेमुळे अत्यंत संतप्त आहे.” या यात्रेदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) व्यासपीठावरून तसेच काँग्रेसच्या सोशल मीडियावरून महिलांचा अपमान केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा : 

दिल्लीतील संस्थेत १७ मुलींशी अश्लील वर्तन; संचालक चैतन्यनंद सरस्वती यांच्यावर गुन्हा

संयुक्त राष्ट्र महासभा: इंडोनेशियाच्या अध्यक्षांकडून भाषणाचा समारोप “ओम शांती, शांती ओम”ने

गाण्याच्या नावाखाली दुर्गा देवीचा अपमान करणारी सरोज सरगम अटकेत!

नेपाळ हिंसाचारात माजी पंतप्रधानांच्या पत्नी गंभीर जखमी; पुढील उपचारासाठी भारतात हलवले!

“नवरात्र हा ‘नारी शक्ती’चा उत्सव आहे, ज्यात आपण महिलांचा सन्मान करतो. अशा काळात राहुल गांधी आणि काँग्रेसने केलेले महिलांचे अपमान करणारे वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे,” असे केशवन म्हणाले. ते पुढे म्हणाले, काँग्रेस कार्यकारिणीला आज एक ठराव मंजूर करून महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेचा अनादर आणि अपमान केल्याबद्दल आणि पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईचा अपमान, निंदा केल्याबद्दल बिहारच्या महिला आणि भारतातील महिलांची बिनशर्त माफी मागण्याचा ठराव मंजूर करावा लागेल.

“जर त्यांच्या (काँग्रेसच्या) मनात थोडीशी जरी लाज किंवा सद्सद्विवेकबुद्धी उरली असेल, तर त्यांनी आजच्या CWC बैठकीत ठराव पास करून भारतीय ‘नारी शक्ती’ची माफी मागावी,” असे आवाहन केशवन यांनी केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा