26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषमहाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी

महाराष्ट्र पोलीस दलाची सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी

राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. गोरेगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले की, ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय‘  या महाराष्ट्र पोलिस दलाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. हरियाणा येथे आयोजित आखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर -२०२३ स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने सहा सुवर्ण चार रौप्य व बारा कांस्य अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत. जागतिक पोलीस आणि फायर गेम्स २०२३विनिपेग कॅनडा येथे आयोजित कुस्ती /बॉडी बिल्डिंग/ फिझिक्स बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी तीन सुवर्णदोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण सात पदके प्राप्त केली आहेत.  मुंबई येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय आणि साऊथ एशियन रब्बी स्पर्धेत- २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस रब्बी संघाने कांस्यपदक प्राप्त केले आहे.

हेही वाचा..

भारत सरकारने ‘तहरीक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केल्याने पाकिस्तानचा जळफळाट!

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला ४४७.५ कोटींची जीएसटी नोटीस

पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला

ओडिशा: पुरीतील जगन्नाथ मंदिरात ड्रेस कोड लागू!

भोपाळ येथे आयोजित ६३ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी एक सुवर्ण चार रौप्य व सहा कांस्य अशी एकूण ११ पदके प्राप्त केले आहेत. गुजरात येथे आयोजित २४ व्या अखिल भारतीय पोलीस बॅण्ड स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस पाईप बँड संघाने सुवर्णपदक प्राप्त केली आहेत तसेच बिगुल संघाने सुवर्ण पदकब्रॉस बॅण्ड संघाने कांस्य पदक प्राप्त केले आहे. तसेच बेस्ट पाईप ब्रँड प्रकारात एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस पाईप ब्रँड संघाने सलग सहा सुवर्ण पदक प्राप्त केली आहेत. अशा प्रकारे राज्याची संघभावना कायम राखून राज्याचा नावलौकिक केले आहे. असेही राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.

फणसाळकर म्हणाले की२ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो. सागरी सुरक्षानक्षलवादाबरोबरच सायबर सुरक्षा सारखे नवे आव्हान उभे आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिलालहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात सध्या एकूण ४८ सायबर पोलीस ठाणे व ४४ सायबर लॅब सुरू करण्यात आल्या असून अत्याधुनिक तंत्रसामुग्री पुरविण्यात येत आहेत. तसेच यावर्षी पोलीस दलामध्ये १८ हजार नवीन पदे भरण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू असल्याचेही त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले. संचलनामध्ये मुंबई पोलीसराज्य राखीव पोलीस दलाची तुकडीनिशाण टोळीमहिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. बॅण्ड पथकाकडून स्वतंत्र वादनकमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. कार्यक्रमाला मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारीनिवृत्त अधिकारी तसेच पोलीस जवान उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा