32 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषवर्तुळाचा स्थिरांक Pi

वर्तुळाचा स्थिरांक Pi

Google News Follow

Related

आज दिनांक १४ मार्च रोजी एक सुंदर वैज्ञानिक योगायोग असतो. एक म्हणजे आज आंतरराष्ट्रीय पाय (pi) दिन आणि दुसरा म्हणजे भौतिक शास्त्रातील नामवंत शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म दिवस!

Pi हा गणितातील आवश्यक आणि मूलभूत स्थिरांक आहे. कोणत्याही वर्तुळाचा व्यास आणि परिघ यांच्यातील गुणोत्तर देणारा हा स्थिरांक आहे. कोणत्याही वर्तुळाचा परिघ हा त्याच्या व्यासापेक्षा तीनपटीपेक्षा थोडासा मोठा असतो. हे संख्यांमध्ये दाखवताना ३.१४ या आकड्यात आणि २२/७ या रुपात दाखवला जातो. Pi चे कॅलक्युलेटरवर दिसणारे आकडे ३.१४१५९२६५३५९ असतात, कारण कॅलक्युलेटरला आकड्यांची मर्यादा असते. वास्तविक Pi ही अपरिमेय संख्या आहे. त्यामुळे यात एकापुढे एक आकडे येत जातात. यांत कोणत्याही प्रकारची नियमितता आढळत नाही. 

हा दिवस १४ मार्चला साजरा करण्यामागे सुद्धा एक गंमत आहे. Pi मधले पहिला आकडा आहे ३, त्यामुळे तिसरा महिना, म्हणून मार्च महिना! त्यानंतरचे आकडा येतो १४, ती तारिख! म्हणून १४ मार्च हा Pi दिन!

हे ही वाचा:

सचिन वाझे यांना पंचवीस मार्च पर्यंत एनआयए कोठडी

सचिन वाझे कोर्टात हजर

पूर्वी शिवसैनिक असल्याने वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का? – देवेंद्र फडणविस

Piने अनेक जागतिक कीर्तीच्या गणितज्ञांना प्राचीन काळापासून, म्हणजे अगदी ४,००० वर्षांपासून भुरळ घातली आहे. अगदी प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ यांनी आपल्या आयुष्यातला बराच काळ Pi च्या संशोधनासाठी दिला आहे. यात अगदी न्युटन, फिबोनाची, लाईबनिझ, गाऊस यांच्यासारख्या नामवंत शास्त्रज्ञांपासून ते कमी माहितीच्या गणतज्ञांचा देखील समावेश होतो. इतिहासात देखील Pi चे आकडे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. प्राचीन बॅबिलोनियन आणि इजिप्शियन गणितज्ञांनी देखील अनुक्रमे ३.१२५ आणि ३.१६ अशी Pi चे उत्तर शोधले होते. त्यानंतर आर्किमिडीजने प्रथम अल्गोरिदमचा वापर करून Pi अंकात लिहीले होते. आर्किमिडीजने समभुज त्रिकोणात वर्तुळ आणि त्यात आणखी एक समभुज त्रिकोण काढला होता. त्यानंतर बाहेरच्या आणि आतल्या आकृतींत एक एक भूजा वाढवत वर्तुळाच्या जवळ जायला सुरूवात केली. शेवटी ९६ भुजांच्या आकृतीनंतर तो Pi च्या आजच्या किंमतीच्या जवळ पोहोचला होता. आधुनिकतेने Pi चे उत्तर ३१.४ ट्रिलियन आकड्यांपर्यंत उत्तर शोधले होते. परंतु व्यवहारात ३९ व्या संख्येपर्यंतची Pi ची किंमत वापरली जाते, आणि त्यातूनही बिनचूक उत्तर मिळते

Pi चा वापर अनेक ठिकाणी केला जातो. आधी म्हटल्या प्रमाणे Pi वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर असल्याने या दोन्हीचा वापर जेथे करावा लागतो अशा सर्व भौमितीय आकृत्यांत Pi वापरला जातो. यात वर्तुळ, कोन, घनगोल, दंड गोल यांचे घनफळ, बाह्यक्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ इत्यादी सर्व मोजण्यासाठी Pi चा वापर केला जातो. 

असा हा Pi वर्तुळाच्या भुमितीतील आवश्यक आणि अत्यंत मूलभूत स्थिरांक!! विश्वातल्या कोण्यातही वर्तुळ अथवा घनगोलासाठी वैश्विक असल्याने यांच्याशी निगडीत कोणत्याही प्रकारच्या संशोधनासाठी आवश्यक आणि महत्त्वाचा ठरतो. 

– प्रणव पटवर्धन

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा